आरोग्यदायी औषधी-युक्त धोतरा.
हौस म्हणून किंवा फुलांची आवड म्हणून. घराच्या अंगणात अनेक फुलझाडे लावली जातात. त्यतील काही औषधी गुणधर्माच्या असतात. कधी कधी काही गोष्टी आपल्या जवळ असून देखील आपल्याला याची कल्पना देखील नसते, तसेच अंगणातील वरळ असे झाड म्हणजे धोतरा. धोतर्याची वाळलेली पाने, फुलेअसणारया फांद्यांची शेंडे आणि बिया. यां पासून धोत्री हे औषध तयार होते. धोत्र्याच्या पानात हायोसायामन हे प्रमुख क्रियाशील तत्व असते. ते अनेक व्याधींवर उपयुक्त ठरते. फुफुसाच्या नळ्या सुजन्यावर, तोंडातील लाळेवर नियंत्रणठेवण्यासाठी. आणि दम्यावर उपचार म्हणून धोतरा वापरतात. दोत्र्याच्या पानांचा धूर करून नाकाने आत घेतल्यास दमा कमी होण्यास मदत होते. त्याच प्रमाणे स्नायूंच्या झटक्या वर नियंत्रण ठेवण्यासाठी हि या औषधाचा उपयोग होतो. धोत्र्याच्या पानांप्रमाणे बियाही औषधी असतात. धोतरा हे एक मीटर पर्यंत वाढणारे आणि शुभ्र रंगाचे मोठे फुल असणारे झाड आहे.
Source : Marathi Unlimited.