गुणकारी टोम्यटो!
*** आपल्याकडे मिळनार्या जवळ जवळ सर्वच फळभाज्यांत पालेभाज्यांत अनेक औषधीगुण आढळतात. त्याची संपूर्ण माहिती घेऊण त्यानुरूप त्या त्या भाज्यांचा उपयोग करता येतो. रुचीवर्धक तसेच शक्तीवर्धक असलेल्या टोम्यटो मध्ये व्हिटामिन ए, पोट्यशियम आणि क्यल्शियम अधिक प्रमाणात आढळते. या शिवाय रक्त दोषामुळे त्वचेवर लालसर पुरळ निर्माण झाले असतील, दातातून रक्त येत असेल दाढा सुजल्या असतील तर टोम्यटोचा रस २०-२० ग्रॅम मात्रे मध्ये दिवसातून चार वेळा घ्यावा. यामुळे हे सर्व त्रास कमी होण्यास मदत होते. त्याच रसात पुदिना, आल्याचा रस आणि सैंधव मिसळून एकत्र पाण्या बरोबर घेतल्यास ग्यसेस ची समस्या दूर होते. टोम्यटो कापून स्टीलच्या भांड्यात ते मंद आचे वर थोडे शिजून त्यात सैंधव, थोडा मसाला टाकून घेतल्यास अजीर्ण कमी होण्यास मदत होते. अंगात ताप असेल तर टोम्यटो च्या सुपात अर्धा चमचा दालचिनीची पावडर टाकावी. हे मिश्रण दिवसातून दोन वेळा घ्यावे. * गर्भवती महिला साठी दिवसातून एक ग्लास टोम्यटो रस फार फायदेशीर आहे. रक्ताल्पतेसाठी टोम्यटो रामबाण उपाय म्हणून सिद्ध झालेले आहे. याच्या सेवनाने रक्ताची कमतरता दूर होते.यासाठी दररोज १०० ग्रंम रस सेवन करावा. भोजनात कच्चा टोम्यटो खाणे अतिउत्तम होय. तसेच टोम्यटो च्या रसात अर्जुन वृक्षाची साल आणि साखर मिसळून चटणी तयार करून ती दिवसातून ५ ग्रॅम मात्रेच्या प्रमाणात सेवन केल्याने हृदय विकाराला चांगला लाभ होतो. उलटी वरही टोम्यटोचा रस फायदेशीर आहे. शिवाय छातीत धड धड करणे, घाबरल्या सारखे वाटणे यासारख्या विकारां साठी टोम्यटो चा रस फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. टोम्यटोतील क्यल्शीयम मुळे दात, तसेच हाडे मजबूत बनतात. ईतर भाज्यांच्या तुलनेत याचे दरही कमी असतात. यामुळे या गुणकारी टोम्यटो चा आहारात समावेश करून विविध व्याधीनपासून बचाव करावा.
Source : Marathi Unlimited.