तिथींच्या संज्ञां.
नंदा, भद्रा, ज्या रिक्ता आणि पूर्णा अश्या तिथींच्या पाच संज्ञां आहेत. याच संज्ञां प्रतिपदे पासून अनुक्रमे पुन: पुन: येतात. से प्रतिपदा, षष्टी, एकादशी या नंदा तिथी होत.द्वितिया, सप्तमी, द्वादशी या भद्रा तिथी होत. तृतीया, अष्टमी, त्रयोदशी ह्या जया तिथी होत. चतुर्थी, नवमी, चतुर्दशी, या रिक्ता आणि पंचमी, दशमी आणि पोर्णिमा ह्या पूर्णा तिथी होत. शुक्लपक्षातील प्रतिपदे पासून पंचमी पर्यंत पाच तिथी कनिष्ठ, षष्टीपासून दशमी पर्यंत पाच तिथी मध्यम व शुक्लएकादशी पासून पूर्णिमे पर्यंत पाच तिथी उत्तम होत. तसेच कृष्ण पक्षातील पहिल्या पाच तिथी उत्तम, षष्ठी पासून पाच मध्यम आणि एकादशी पासून पांच कनिष्ठहोत. हा नियम कोणत्याही तिथीं विषयी जाणावा. त्याशिवाय शुक्ल व कृष्ण पक्षातील द्वितिया, तृतीय, पंचमी, सप्तमी, दशमी, एकादशी, प्रतिपदा [हि फक्त कृष्णपक्षांतील] त्रयोदशी आणि पौर्णिमा ह्या तिथी सामान्यत: सर्व शुभ कार्यांना युक्त आहे. या शिवाय बाकी ज्या तिथी राहिल्या त्या म्हणजे चतुर्थी, षष्टी, अष्टमी, नवमी, द्वादशी, चतुर्दशी आणि अमावस्या ह्या अशुभ तिथी होत. ह्यांना पक्षरंध्र तिथी म्हणतात. ह्या सर्व शुभकृत्यांसाठी त्याज्य आहेत. तथापि संकटकाळी पुढे सांगितल्या प्रमाणे आरंभीच्या काही घटिका सोडून ह्या तिथीं वर शुभकृते करावी केवळ संपूर्ण तिथींचा त्याग न केला तरी चालेल.
चतुर्थी, षष्टी, अष्टमी, नवमी, द्वादशी आणि शुक्ल चतुर्दशी ह्या तिथीं वर कोणतेही कृत्य करावयाचे असेल तर त्या तिथिंच्या अनुक्रमाने पहिल्या आठ, नऊ, चवदा, पंचवीस, दहा आणि पाचं घटीका सोडाव्या. म्हणजे चतुर्थीच्या आरंभा पासून पहिल्या आठ घटिका, षष्टीच्या नऊ घटिका, अष्टमीच्या चवदा घटिका, नवमीच्या पंचवीस, द्वादशीच्या दहा आणि चतुर्दशीच्या [शुक्ल] पांच घटिका सोडून बाकी राहिलेल्या तिथींवर शुभ कृत्ये करावी. काही ऋषी सर्व परीरंध्र तिथींच्या प्रारंभाच्या केवळ दहा घटिका मात्र सोडाव्या असे म्हणतात. कृष्णपक्षातील चतुर्दशी, शुक्लप्रतिपदा आणि अमावस्या ह्या तिथी मात्र संपूर्ण वर्ज्य कराव्या.
कुहू व सिनीवाली तिथी.
ज्या पूर्णिमेला रात्रीच चंद्रोदय होतो तिला राका म्हणतात आणि ज्या पूर्णिमेला दिवसा चंद्रोदय असतो तिला अनुमती अशी संज्ञां आहे; त्याच प्रमाणे ज्या अमावास्ये मध्ये चंद्र दर्शन होत नाही तिला कुहू आणि ज्या अमावास्येत चंद्र दर्शन घडते तिला सिनीवाली म्हणतात.
तिथींची क्षय वृद्धी.
चंद्र वर्षाचे दिवस ३५४ असतात व तिथी ३६० असतात.याचा अर्थ असा कि; ३५४ दिवसांत३६० तिथी भुक्त होतात. म्हणजे सहा तिथींचे अंतर क्षय वृद्धी होऊन निघून जाते.ज्या वेळेस तिथींचे प्रमाण ६० घटिकां पेक्षा जास्त असते, त्या वेळेस तिथीची वृद्धी होते. व ६० घटिकांपेक्षा कमी असते. त्या वेळेस तिथींचा क्षय होतो असे समजतात. वृद्धी म्हणजे वाढणे आणि क्षय म्हणजे कमी होणे.
Source : Marathi Unlimited.