१) वृद्धीचे उदाहरण : प्रतिपदा रविवारी ५७ घटिका आहे असे समजा.म्हणजे रविवारी सूर्योदय पासून इतका काळ गेल्या नंतर प्रतिपदा संपून द्वितीयेस आरंभ झाला. द्वितेचे प्र्मक़्न ६५ घटिका आहे, अशी कल्पना करा म्हणजे प्रतीपदे नंतर चंद्राला १२ अंश सूर्या पुढे जाण्यास ईतका काळ लागला. तेंव्हा प्रतिपदा संपल्या नंतर रविवारच्या राहिलेल्या ३ घटिका, सोमवारच्या सर्व दिवसाच्या ६० घटिका व मंगलवारी सूर्योदय नंतर २ घटिका अश्या, एकंदर ६५ घटिका जातील तेंव्हा द्वितिया संपेल. या उदा. सोमवारी व मंगलवारी अशी २ दिवस सूर्योदयी द्वितीया असल्या मुळे पंच्यांगात २ दिवस लिहिली पाहिजे, म्हणून येथे द्वितीयेची वृद्धी झाली.
२) क्षय तिथीचे उदाहरण : रविवारी २ घटिका प्रतिपदा आहे.अशी कल्पना करा. नंतर द्वितिया लागली.द्वितीयेचे प्रमाण फक्त ५४ घटिका आहे, म्हणजे प्रतिपदे नंतर चंद्राला १२ अंश सूर्या पुढे जाण्याला ईतकाच काळ पुरला. रविवारी प्रतिपदेच्या २ घटिका व द्वितीयेच्या ५४ घटिका असा एकंदर सूर्योदय पासून ५६घटिका काळ गेल्या नंतर म्हणजे दुसर्या दिवसाचा सूर्योदय होण्या पूर्वीच तृत्तीया लागली. या उदा. रवीवारी प्रतिपदा व सोमवारी तृतीया लिहावी लागेल द्वितिया सूर्योदयाला कोणत्याही दिवशी नव्हती, म्हणून ती पंच्यांगात दाखविण्याचे कारण नाही.कारण सूर्योदयी ती तिथी किंवा जे नक्षत्र वैगरे असते तेच पंचांगात दाखवितात.येथे द्वितीयेचा क्षय झाला,म्हणजे द्वितिया मुळीच नाही असा अर्थ नव्हे, तर ती सूर्योदयाला मात्र कोणत्याही दिवशी नव्हती ईतकेच.
३) तिथींच्या क्षयवृद्धींचा दोष : कोणत्या हि तिथींचा क्षय होतो तेंव्हा एका वारी तीन तिथी असतात. आणि वृद्धी होते तेंव्हा तीन वारी एक तिथी असते. वर क्षयतिथींचे उदाहरण दिले आहे, त्यात रविवारी प्रथम २ घटिका प्रतिपदा, नंतर ५४ घटिका द्वितिया आणि नंतर ४ घटिका तृतीया होती, म्हणजे रविवारला प्रतीपदा, द्वितिया आणि तृतीया अस्या तीन तिथीचा स्पर्श झाला.तसेच वृद्धीचे उदाहरण पहा. प्रतिपदा रविवारी ३ घटिका, सोमवारचा सर्व दिवस आणि मंगळवारच्या २ घटिका या प्रमाणे रविवार, सोमवार आणि मंगलवार अश्या तीन वारांना प्रतिपदेचा स्पर्श झाला.म्हणून एका वारी ३ तिथि किंवा ३वारि एक तिथी असा तिहींचा सम्बंध असल्यामुळे धर्मशास्त्रकारांनी क्षय वृद्धींचे दिवस शुभ कार्याला वर्ज्य मानिले आहेत. ‘तथापि सबले भानौ लाभस्थे वा तथा विघौ ”या वचना प्रमाणे बलवान सूर्य किंवा बलिष्ठ चंद्र एकादश स्थानात असेल तर क्षय तिथिंचा दोष नाहीसा होतो. एक्या वारी तीन तिथी आल्या म्हणजे त्या अवम तिथी होत. तसेच एक तिथी तीन वारी सूर्योदय समयी असता तिला ”त्रिद्युस्पृक” तिथी म्हणतात.
Source : Marathi Unlimited.