एक पक्ष म्हणजे पंध्र् वडा:हा सामान्यत: पंधरा दिवसाचा असतो. असे जरी आहे तरी तिथीच्या क्षयवृद्धीमुळे कघी कधी चवदा किंवा सोळा तीथीचाही पंध्रवडा होतो. क्वचित प्रसंगी तेरा दिव- साचा हीं होतो, त्याला विश्वघस्त्रपक्ष म्हणतात. विश्वधस्त्र येतो, तेव्हा प्रतिपदा द्वितीया किंवा तृतीया यापैकी एखाद्या तिथीला क्षय होऊन त्या मानाने पुढील तिथीची व्याप्तीही कमीच होत जाते आणि शेवटी चतुर्दशी, पूर्णिमा, किंवा अमावस्या यातून एखाद्या तिथीचा क्षय होतो व त्यामुळे तेरा दिवसांचा विश्वघस्त्रपक्ष संभवतो. तो जगांत उद्भवणाऱ्या संकटाचा सूचक असतो. अश्या तेरा दिवसांच्या पंध्रवड्यात विवाह, वास्तुशांती, गृहारंभ, उपनयन किंवा कोणतेही मंगलकृत्ये करू नये. कृष्णपक्षांत विश्वधस्त्रपक्ष संभवेल तर फारच अशुभ होय. शुक्लपक्षात असलेला त्याहूनही किंचित कमी भयसूचक असतो ईतकेच.
Source : Marathi Unlimited.