गुणकारी पालक!




Like
Like Love Haha Wow Sad Angry

गुणकारी पालक!

spinach uses

जवळपास सार्यांना आवडणारी आणि बारमाही उपलब्ध होणारी पाले भाजी म्हणजे पालक सर्वाधिक ओउश्धी गुणधर्म असणारी भाजी म्हणून हि प्रचलित आहे. पालकात सोडींयम, फॉंस्फरस क्यल्शियम पोट्यशियम, लोह अशी सर्व पोषक तत्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. जीवन सत्व अ आणि क मुले पालक आरोग्यासाठी चांगला मानला जातो. लोह हे तत्व मानवाच्या शरीरसाठी आवश्यक आणि महत्वाचे असते. लोहा मुळे रक्त शुद्ध राहते आणि रक्ताभिसरनहि सुरळीत राहते. पालकाच्या नियमित सेवनामुळे डोळे, कान, नाकाचे मारी सुरळीत चालते. पालक खाऊन हृदयरोगापासूनही दूर राहता येते. श्वास आणि पित्ताशी समबंधित विकारांवर पालक गुणकारी ठरतो. आयुर्वेदानुसार पालकाचीभाजी चविष्ट आणि पचायला हलकी असते यकृतातहि समबंधित व्याधींपासून सुटका मिळविण्यासाठी हि भाजी खाण्याचा सल्ला दिला जातो. आशय उकाड्यामुळे होणारा त्रास, फुफुसातील जळजळ यासाठी पालक लाभदायी ठरते. तसेच स्त्रीयांसाठी पालक लाभदायक ठरते. आणि चेहर्याचे नैसर्गिक सौदर्य वाढण्यासाठी पालकाच्या रसाचे नियमित सेवन करायला हवे. पालकाची भाजी खाण्यापेक्षा तो कच्चा खाल्याने जास्त लाभ होतो. पालकाची पाने पाणी न घालता पिळून रस काढून प्यायल्याने पोट साफ होते. कमी भूक लागणे थकवा जाणवणे, वजन कमी होणे, स्मरण शक्ती कमी होणे, दातदुखी अश्या विकारांवर पालक लाभदायी ठरतो. त्यामुळे या भाज्यांचा जास्त प्रमाणात वापर करून आपले आरोग्य सांम्भाळून घ्या.

Source : Marathi Unlimited

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu