** सर्वे भवंतु सुखिन:
दुष्टांचा कुटिलपणा नाहीसा व्हावा.त्यांना सत्कर्मात आवड निर्माण व्हावी.प्राण्यांची एकमेकात मैत्री व्हावी पापांचा अंधार दूर व्हावा सर्व जगात स्व: धर्माचा उदय व्हावा जो प्राणी जे ईच्छिल ते त्याला प्राप्त व्हावे. सर्व पृथ्वीवर ईश्वर निष्ठांचा सामूदाय निर्माण व्हावा. चालणारया कल्पतरूंचे बगीचे तयार व्हावे.चिंतामणी सजीव व्हावे. अमृताचे सागर बोलणारे व्हावेत.चंद्र कलंक रहित व्हावा.सूर्य उष्णता रहित व्हावा.सज्जनांची आवड सर्वांना वाटावी. तिन्ही लोक सर्व सुखांनी पूर्ण होऊन त्यांचे चित्त आदिपुरुष्याच्या ठिकाणी अखंद असावे.
* सुविचार—
भटकणारे मन प्रभूच्या छत्र छायेत येऊनच शांत होऊ शकते
** ज्ञान हा युग निर्मितीचा आधार आहे. ज्ञानामुळे व्यक्तीचे विचार सुविचार बनतात.प्रत्येक बाबीकडे मनुष्य चांगल्या विचाराने बघू लागतो.संकुचीत भावना ज्ञानामुळेच व्यक्तीमध्ये निर्माण होते.यातूनच चांगल्या कुटुंबाची,चांगल्या समाजाची व चांगल्या राष्ट्राची निर्मिती होऊ शकते.ईतरांचे दु:ख तो आपले दुख मानू लागतो. ज्ञानामुळे व्यक्तीमध्ये धैर्य व आत्मविश्वास निर्माण होतो. ज्ञांनामुळेच व्यक्तीला कोणत्याही संकटावर मात करण्याचा मार्ग सापडतो. ज्ञांण हे दुसर्याला चोरता येत नाही. ज्ञांन मुले अंतकाळी व्यक्तीला मृत्यूचेहि भय वाटत नाही.ज्ञान हे दुसरयाला दिल्या नंतर त्यात घट न होता वाढच होते.म्हणून ज्ञान हे सर्व श्रेष्ठ होय.
Source : Marathi Unlimited