महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मुंबई हायकोर्टानं नोटीस बजावलीय. शिवाजी पार्कवर राजकीय सभा घेण्यावर कोर्टानं घातलेल्या बंदीचा अपमान केल्याप्रकरणी राज ठाकरे यांना ही नोटीस बजावण्यात आलीय. पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेण्यासाठी याचिका केली होती. मात्र, शिवाजी पार्क हे शांतता क्षेत्र असल्यानं कोर्टानं या याचिकेला धुडकावून लावलं. यानंतर राज ठाकरे यांनी कोर्टाचा निर्णय पक्षपाती असल्याची टीका केली होती.
Source : Marathi Unlimited.