राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना आपल्या गाडीतून मातोश्रीवर सोडले. राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले असून ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या चर्चा करणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या छाती दुखू लागल्याने त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी अलिबाग दौऱ्यावर गेल्या राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची लिलावती हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी डिस्चार्ज मिळणार त्यावेळी राज ठाकरे पुन्हा लिलावती हॉस्पिटलमध्ये गेले, त्यावेळी त्यांनी डिस्चार्ज मिळालेल्या उद्धव ठाकरेंना आपल्या मर्सिडीज गाडीतून मातोश्रीवर सोडले. यावेळी राज ठाकरे यांनी स्वतः गाडी चालवली. तर राज ठाकरे यांच्या शेजारी बसून उद्धव ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले. आता दोन्ही ठाकरे बंधू शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेणार आहे.
उध्दव यांच्या प्रकृतीबद्दल बाळासाहेब ठाकरे यांच्याशी राज चर्चा करणार आहेत. त्यांनंतर संध्याकाळी पाच वाजता पुन्हा उध्दव यांची भेट घेणार आहेत. तसेच ते लिलावती हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहे. आज सकाळी उध्दव ठाकरे यांना छातीत दुखू लागल्याने लिलावतीत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
Source : Marathi Unlimited.