मुंबई, कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागातही त्याने हजेरी लावली. कोकणातील सलग दुसर्या दिवसाच्या अतवृष्टीमुळे तेथील काही धरणे भरुन वाहू लागली आहेत. येत्या ४८ तासांत राज्यात अनेक ठिकाणी दमदार पावसाची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. मुंबई : बृहन्मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील सात महापालिकांना पाणी पुरवठा करणार्या ११ धरणांमध्ये आज ४८१ मिमी पाऊस पडला आहे. कोल्हापूर – जिलत आज दिवसभर पावसाची रिपरिप सुरू राहिली. गगनबावडा, राधानगरी तालुक्यांत अतवृष्टी झाली. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २५९ मिली मीटर तर राधानगरी तालुक्यात ६७ मिली मीटर पावसाची नोंद झाली. अहमदनगर – जिल्ह्यात आजपर्यंतचा सर्वात जास्त पाऊस आज शहरात झाला. जिल्ह्यातील १४ तालुक्यात आत्तापर्यंत एकूण ९३७ मिलीमीटर पाऊस झाला असून सरासरी ६४ मिलीमीटर इतकी आहे. नाशिक – गेल्या दोन दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. औरंगाबाद – बीड, नांदेड, लातूर, परभणी या जिलत जोरदार पावसाने हजेरी लावली.
Source : Marathi News Updates.