राहुल लवकरच मंत्रिमंडळात?

Like Like Love Haha Wow Sad Angry यूपीए सरकार अथवा काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाईल...
Like
Like Love Haha Wow Sad Angry

rahul gandhiयूपीए सरकार अथवा काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांच्याकडे लवकरच मोठी जबाबदारी सोपवली जाईल याची चर्चा सुरू होतीच . गुरुवारी खुद्द राहुलनीच त्याला स्पष्ट शब्दांत दुजोरा दिला . सरकार वा संघटनेत अधिक सक्रिय भूमिकेसाठी मी पूर्णत : तयार आहे . मात्र , ते प्रत्यक्षात कधी घडेल ते पंतप्रधान डॉ . मनमोहन सिंग आणि पक्षाचे नेते ठरवतील , असे राहुल गांधी गुरुवारी एका मुलाखतीत म्हणाले . लोकसभेची २०१४ सालची निवडणूक डोळयासमोर ठेवून राहुलने आपल्या भूमिकेची तयारी चालवली आहे . उत्तरप्रदेश निवडणुकीत राहुलच्या कोअर ग्रुपमधे काम केलेल्या एका नेत्याच्या मते त्याआधीच होणाऱ्या अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांवरही राहुल लक्ष ठेवून आहे . गेल्या वर्षभरात पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकींनी शिकवलेला धडा आणि काँग्रेसला मिळालेले मर्यादित यश लक्षात ठेवून , जाणिवपूर्वक लो प्रोफाइल भूमिकेत स्वत : ला ठेवणे , हा देखील राहुलच्या रणनीतीचाच एक भाग आहे .

Source : Marathi News.

Like
Like Love Haha Wow Sad Angry

Related Stories