पंतप्रधान कार्यालयानं अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. भारत परदेशी गुंतवणूकदारांचा जगातला तिस-या क्रमांकाचं पसंतीचा देश आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय. ओबामांना प्रत्यूत्तर देण्यासाठी पंतप्रधान कार्यालयानं यूएन रिपोर्टचा दाखला दिलाय. ओबामांनी भारतात अजूनही परदेशी गुंतवणूक कठीण आहे तसंच भारतात विकास करायचा असल्यास परदेशी गुंतवणूक गरजेची असल्याचं म्हटलं होतं.
Source : Marathi News