पेट्रोलचे दर ९२ पैशांनी, डिझेलचे ८९ पैशांनी तर घरगुती सिलेंडरचे दर ९ रुपयांनी भडकले आहेत. ही दरवाढ मध्यरात्रीपासून लागूही झाली आहे. कोणत्याही दरवाढीच्या घोषणेचे संकेत न पाळता ही दरवाढ लागू झाली आहे. विशेष म्हणजे, सात राज्यात दरवाढ झालेली असताना ११ राज्यांत कर समायोजनेमुळे दर कपात झाली आहे. मध्यरात्रीपासून मुंबईत पेट्रोलचे भाव प्रति लिटर ७५.१४ रुपये, डिझेल प्रति लिटर ४५.२८ रुपये तर घरगुती गॅसची किंमत ४२३ रुपये इतकी झाली आहे.
Source : Marathi News