महिन्याच्या तीस तिथी असतात हे सर्वांनाच माहिती आहे. पंधरा तिथीचा एक भाग असे तीस तिथींचे म्हणजे महिन्याचे दोन भाग कल्पिलेले आहे. त्याचं पक्ष किंवा पंध्रवडे म्हणतात. एक शुक्ल म्हणजे चांदण्यांचा पक्ष दुसरा म्हणजे काळोखाचा पक्ष. प्र्तीप्डे पासून पोर्णिमेपर्यंत जे पंधरा दिवस तो शुक्ल पक्ष, व पूर्णिमेनंतर अमावास्येपर्यंत तो कृष्ण पक्ष. शुक्ल पक्षातील प्रत्येक तिथीस रात्रीच्या आरंभापासून चंद्रोदय होउन तिथीच्या दुप्पटीईतक्या घटीकांपर्यंत चांदणे असते. उदा. प्रतिपदेस दोन घटिका चांदणे असते, द्वितीयेस चार घटिका, अष्टमिस सोळा घटिका आणि पुर्निमेस तीस घटिका म्हणजे सारी रात्र चांदणे असते. या वेळेस चंद्राच्या कला पूर्ण होतात.नंतर कृष्ण पक्षास आरंभ झाला म्हणजे प्रत्येक तिथीस चंद्राचे चांदणे.दोन दोन घटिका कमी होत जाते. म्हणजे तित५हिच्य दुप्पटी ईतक्या घटिका उशिरा चंद्र उगवतो. उदा. प्रतिपदेस दोन घटिका रात्रीं चतुर्थीस, आठ घटिका रात्रीं, अष्टमीस सोळा घटिका रात्री चंद्रोदय होवून चांदणे पडतेव अमावास्येस सारी रात्र काळोख असतो. यावरून हे स्पष्ट झाले कि शुक्ल पक्षात तिथीच्या दुप्पटी इतक्या घटीकांनी रात्री चंद्र मावळतो, आणि कृष्ण पक्षात पूर्णिमे पासून गेलेल्या तिथीच्या दुप्पटी ईतक्या घटीकांनी तो रात्री उगवतो, उदा. शुक्ल अष्टमीस सोळा घटिका रात्रीं चंद्र मावळतो, आणि कृष्ण अष्टमीस सोळा घटिका रात्रीं तो उगवतो. याचे कारण असे आहे की, प्रत्येक तिथीस चंद्र बारा अंश पुढे जातो. म्हणजे आजच्या तिथीस ज्या वेळी तो उगवेल त्या वेळेच्या बारा अंश मागाहून उद्या उगवेल हे स्पष्ट आहे. पृथ्वीला ३६० अंश फिरण्यास ६० घटिका लागतात: या हिशेबाने १२ अंशाला म्हणजे एका तिथीला २ घटिका पाहिजेत. शुक्ल पक्षात चंद्राच्या कलांची वृद्धी होत असल्या मुळे रोज रोज दोन दोन घटिका चांदणे अधिक पडते. व कृष्ण पक्षात क्षय होत असल्यामुळे रोज रात्रीच्या आरंभीच्या दोन दोन घटिका चांदणे कमी होत जाते. शुक्ल पक्षातील स्पटीकासारखे शुभ्र असे आल्हादजनक पौर्णिमेचे चांदणे पाहून कित्येक असे म्हणताना आढळतात कीं, परमेश्वराने प्रती रात्रीं अश्या चांदण्यांची योजना कां केली नाही? परंतु जसा प्रतिदिनीं सूर्याचा पूर्ण प्रकाश असतो त्याप्रमाणे, प्रती रात्री चंद्राचे पूर्ण चांदणे असते तर आज ज्या असंख्य तार्यांचा शोध लागलेला आहे, तो लागला असता कां? चंद्र प्रकाश असतांना बहुतेक तारें दिसत नाहीत हे जसे आपण पाहतो, तसेच अमावास्येच्या रात्री अगणीत तारे आपणास दृष्टीगोचर होतात हेंही आपण पाहतो. याशिवाय हि अशी व्यवस्था करण्यातं परमेश्वराचे दुसरे अनेक महत्वाचे हेतू असतील. तात्पर्य, ईश्वरकृती परिपूर्ण व निर्दोष आहे, तींत सुधारणेला लेशहीं अवकाश नाही.
जोतीर्मुख आवृत्ती मधून.
Source : Marathi Unlimited.