ओबामांच्या सावत्र भावाचे केनियाच्या झोपडपट्टीत वास्तव्य!
अमेरिकेचे अध्यक्ष व नोव्हेंबरमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार बराक ओबामा यांचा सावत्र भाऊ केनियातील झोपडपट्टीत राहत असल्याचे एका माहितीपटाने उघडकीस आणले आहे. मात्र ओबामा यांच्या मदतीची आपल्याला काहीही गरज नसल्याचे ओबामा यांचा भाऊ जॉर्ज ओबामा याने म्हटले आहे. ‘२0१६ : ओबामा यांची अमेरिका’ असे या माहितीपटाचे नाव असून, दिनेश डिसुझा यांनी हा वृत्तपट तयार केला आहे. या वृत्तपटाला दिलेल्या मुलाखतीत जॉर्ज ओबामा यांनी माझा चरितार्थ चालविण्यासाठी मी सक्षम आहे, असे सांगितले.
Source : Marathi Updates.