नक्षत्र प्रकरण.
सर्व शुभ कृत्यांनविषयी प्रथम नक्षत्र वृद्धी पहावी, म्हणजे त्या नक्षत्रांवर जे कर्म करणे उक्त आहे. त्याच नक्षत्रान वर ते कर्म करावे. नक्षत्रांचा संबंध आरंभ स्थानाशी आहे, म्हणून सायन व निरयन नक्षत्रे भिन्न असतात चंद्राच्या गतीचे प्रमाण ठरविण्या करीता क्रांतीवृत्ताचे २७ विभाग कल्पिले आहेत. त्या विभागा पैकी प्रत्येक विभाग चालून जाण्या साठी चंद्रास लागणारा काळ त्यास नक्षत्र म्हणतात. ते एकूण २७ आहेत. नक्षत्रांची कधी कधी क्षयवृद्धी होते. पण अभिजित म्हणूनही एक २८ वे नक्षत्र आहे. ते उत्तराषाढां आणि श्रवण यांच्या मध्ये मोजतात. पंचांगात जी रोजची नक्षत्रे दिली असतात. त्यांत हे नसते. त्याचे कारण असे कि चंद्राच्या भ्रमण मार्गात हे नसुन त्याच्या अगदी बाहेर म्हणजे उत्तरेकडे आहे. हे सूर्य नक्षत्रे यां मध्ये दाखवितात.परंतु ईतर नक्षत्रातून फिरण्यास सूर्यास जसे तेरा किंवा चौदा दिवस लागतात, त्याप्रमाणे ह्या नक्षत्रातून सूर्याला जाण्यास ईतका काळ न लागता फक्त चार साडे चार दिवस पुरतात.
१) अभिजित नक्षत्राचा भोग्य काळ.
वैश्य म्हणजे उत्तराषाढां नक्षत्राचा अंत्य चरण आणि श्रवण नक्षत्राचा पहिला पंधरावा अंश मिळून अभिजित नक्षत्राचा भोग्य काळ असतो; आणि जेथे २८ नक्षत्रे घेणे असतील तेथेच अभिजित नक्षत्र धरावे;अन्यत्र याचे ग्रहण करू नये.
२) शुभाशुभ नक्षत्रे.
मघा, मृग, हस्त, स्वाती, मुल, अनुराधा, रोहिणी, रेवती, उत्तर, उत्तराषाढाआणि उत्तरा भाद्रपदा अशी ११ नक्षत्रे कोणत्याही शुभ कार्याचे आरंभास, विवाहास, कन्या वरण्यास, शेतात बी पेरण्यास, काही वस्तू संग्रह करण्यास, गृहप्रवेश आणि ग्राम प्रवेश करण्यास प्रशस्त मानिलेली आहे. तसेच अश्विनी, पुष्य, चित्रा, घनिष्ठा,श्रवण आणि पुनर्वसू, हि ६ नक्षत्रे शुभ कार्यास उक्त मानिलेली आहे. परंतु त्या नक्षत्रांवर विवाह मात्र करू नये, याशिवाय राहिलेल्या नक्षत्रां पैकि तिन्ही पूर्वा, जेष्टा, आर्द्रा आणि शततारका हि मध्यम नक्षत्रे होत. आणि भरणी, कृतिका, अश्र्लेषा हि तीन नक्षत्रे अत्युग्र होत. म्हणून हि अत्युग्र नक्षत्रे शुभ कार्यास सर्वथा वर्ज्य करावी.
Source : Marathi Unlimited