राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आज संसद भवनात प्रत्यक्ष मतदान करताना विरोधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार पूर्णो संगमा यांना मतदान करून नामी घोळ घातला. मात्र, आपण चुकीचे मतदान केले आहे हे लक्षात आल्यावर मुलायमसिंग यांनी लगेच दुसरी मतपत्रिका मागून घेऊन त्यावर ठरल्याप्रमाणे प्रणव मुखर्जी यांना मतदान केले! एकदा दिलेले मत रद्द करून पुन्हा नव्याने मतदान करण्याचा हा प्रकार बेकायदा असल्याचा आक्षेप संगमा यांच्या निवडणूक एजंटाने घेतला असून, मुलायमसिंग यांनी नंतर दिलेले मत रद्द करून आधी संगमा यांना दिलेले मत वैध मानावे, अशी मागणी केली आहे.
Source : Marathi Unlimited.