हिंदी चित्रपटसृष्टी स्ट्रगल करीत असतानाच स्पॉट बॉयच्या मदतीने पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय करणार्या २ मॉडेलना पुणे पोलीस दलातील सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या तपासात पैशासाठी या जाळ्यात ओढल्या गेल्याचे निष्पन्न झाले आहे. रोहित अरविंद अगरवाल असे या एजंट स्पॉट बॉयचे नाव आहे. स्पॉट बॉय अगरवाल मॉडेलिंग व अभिनय क्षेत्रातील तरुणींना पुणे शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसायाकरीता पाठवित असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. त्यावरुन त्यांनी मिळालेल्या एजंटच्या नंबरवर कॉल केला तेव्हा त्याने अगोदर माझ्या बँक अकाऊंटमध्ये ५ हजार रुपये भरा, त्यानंतरच बोलतो, असे सांगितले. तरुणी २३ व २६ वर्षांच्या असून त्या अंधेरी आणि उल्हासनगर येथे राहतात. उल्हासनगर येथे राहणार्या तरुणी गेल्या एक वर्षापासून रोहितच्या संपर्कात आहेत. दुसरी तिची मैत्रिण आहे. रोहितने सुरुवातीला काम मिळवून देतो, असे सांगून त्यांच्याशी मैत्री वाढविली.
Leave a Reply