मन माझे.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Man Maze Enter the deadly game show of Man in a Maze and leave with more than your life! Sneak past patrolling robots, avoid deadly traps and fight …

man maze

 आपले शरीर आणि प्राण हि दोन तत्वे म्हणजे मनुष्य नव्हे. हे मनाचे  सेवक आहेत. आणि सेवा करण्यातच त्यांनी समाधान मानावे: हि सेवा  करण्याचा मोबदला म्हणून मनाला त्याचे खास विलास करावयास  मिळतात. प्राण तत्व ही मूळ आणि या तत्वाचा विस्तार किंवा त्याचा  फुलवरा म्हणजे बुद्धी, शरीर व प्राण याहून मन हे मनुष्याचे आंत्रिक  स्वरूप असून ते त्याला अधिक जिव्हाळ्याचे आहे; हे मन जसजसे  विकास पावते तसतसे शरीर आणि प्राण यांना आपले साधन  बनवावयाचा ते आग्रह धरते; मनाला काही आत्माविष्कार करावयाचा  असतो व स्वत:च्या ईच्छाची तृप्ती करावयाची असते. काही खास  सुखद व्यवहार करावयाचा असतो  आणि या साठी शरीर व प्राण हि जोडी त्याला आवश्यक असते. पण हे साधन त्याला पुष्कळच त्रासदायक होते; हे अडचणी उत्पन्न करते. म्हणूनच मनुष्यापुढे अनेक प्रश्न उभे राहतात. कारण मनुष्याचे मन विविध विषयांचा परामर्श घेणारे आहे. ते केवळ भौतिक आणि प्राणिक विषयातच स्वत:ला कोंडून घेत नाही: ते बुद्धीचे विषय, सौंदर्य शास्त्र, नीतिशास्त्र, भावना आणि हृदय, कर्तुत्व आणि कर्म या सर्व गोष्टींकडे मनाची अस्वाभाविक ओढ असते. यापैकी कोणत्याही विषयाकडे मन वळू शकते. त्यावेळी त्याविषयाचे अंतीम सर्व श्रेष्ठ स्वरूप गाठण्याचा त्याचा स्वभाव असतो. हे स्वरूप गाठण्यासाठी मन आपला सर्वजोर लावूनन ही कधी कधी या भौतिक पातळीवर सर्वांशाने हस्तगत करू शकत नाही. किंवा वास्तवात आणू शकत नाही.मनाच्या आकांक्षेचा विषय झालेले कोणत्याही गोष्टींचे श्रेष्ठ स्वरूप मनाला अंशत:हस्तगत होते; मनापुढे ते प्रकाशपूर्ण तेजोमय आदर्श म्हणून तळपत असते; हा आदर्श मनाला आंत मध्ये घेता येतो. हा आदर्शाचा आदेश मन पूर्णत: पाळू शकते. या करिता चैतन्य मय असे व्यवहार आपण आपल्या मनापुढे सर्वथा; आणले पाहिजे.

आपल्या हृदयाची भावनात्मक प्रकृती हि श्रेष्ठतम प्रेम, सहानुभूती, दया, एकात्मता, यांचा आदेश पाळण्यासाठी तळमळत असते. आमचा सौंदर्यवाडी आत्मा सौंदर्य आणि आनंद यांच्या सर्वोत्तम आदर्शासाठी थरारतत असतो, अंतरबाह्य जीवनावर तिचे पूर्ण प्रभुत्व स्थापीत व्हावे आणि तिचा हुकुम सर्वत्र चालावा; याप्रमाणे आपल्या अस्तित्वताच्या निरनिराळ्या अंगांच्या धडपडी आपापल्या श्रेष्ठतम साध्यासाठी एकाचवेळी चालू असतात; तेव्हा आपले प्रांणसेवक आणि देहसेवक मन असा आग्रह धरीत असते कि, देहयुक्त अस्तित्व सुरक्षित राहावे. त्याला आनंद लुताव्यास मिळावा. भरपूर मालमत्त या सुरषितते साठी व आनंदासाठी आपल्या जवळ असावी. हेच खरे सर्व श्रेष्ठ साध्य आहे. व हाच त्याच्या अंतरात्म्याचा आदेश आहे. मानवाची बुद्धी हा एकंदर प्रकार पाहून गोंधळून जाते.मानवाच्या कोणत्याही अंगाणे स्वत:पुरती श्रेष्ठतम मानलेली गोष्ठ त्याला सर्वान्श्याने मिळवून देणे अश्यक्य आहे. हे मानवी बुद्धी  ओळखते आणि मग ती प्रत्येक अंगाचे क्षेत्र वेगवेगळे घेऊन त्या त्या क्षेत्रांत त्या क्षेत्रा पुरता आदर्श आणि धर्म निर्माण करून ठेवते. व तसा ती प्रयत्न करते.

पण याच प्रमाणे सत्याचे आणि विवेकाचे, न्यायाचे आणि सदाचाराचे,सौंदर्याचे आणि आनंदाचे, प्रेमाचे आणि साहानुभूतीचे व एकात्मतेचे, आत्मजयाचे आणि व्यवहाराचे, आत्मरक्षनाचे, मालकीचे आणि कार्यक्षम व सुखी भौतिक जीवनाचे अनेक आदर्श त्या त्या क्षेत्रात मानवी बुद्धीने निर्माण करून ठेवलेले आहेत. कोणत्याही क्षेत्रातील श्रेष्ठतम तेजोमय आदर्श आम्हा सामान्य माणसाच्या पात्रतेच्या पलीकडे फार उंचीवर असतात; क्वचितच माणसे या आदर्शांजवळ जाण्याचा प्रयत्न करू शकतात.

सामान्यत; मानव समूह कमी दर्जाचे साध्य, एखादा रूढ व्यवहार साक्षेप दृष्ठीने बराचसा आदर्श आपल्या समोर ठेवून त्याप्रमाणे वागतात व बोलतात. आणि मानवी जीवनाला श्रेष्ठ आदर्शाचे आकर्षणही वाटते. पण हे आदर्श त्याला झेपत नाही तेव्हा तो ते सोडून देतो. आपले मानवी प्राणमय भौतिक जीवन स्वत:चे शुद्र अन्न्तत्व मोठे मानून त्याच्या बळावर मानसिक नैतिक अशी रूढ व्यवस्था मोडून काढते. जडत्व प्राणतत्व आणि मन हि दोन तत्वे मनुष्याचे ठिकाणी एकत्र येवून एकमेकांवर प्रभाव गाजवीत असली, तरी ती एकमेकांपासून भिन्न आणि विसंवादि असल्याने त्यांची मानसिक व्यवस्था कोलमडते. कारण कि मनाला जीवनाच्या समग्र सत्याची किल्ली सापडली नसल्याने त्याची व्यवस्था भौतिक प्राणतत्व मोडून काढू शकते. त्या करिता मानवी जीवाचे मन व नैतिक अंग यांच्या पातळीच्या वरती अज्ञांत असे मनाहून श्रेष्ठ तत्व आहे. तेव्हा मानवाने प्रथम जीवनाच्या संपूर्ण सत्याची गुरुकिल्ली शोधूनच  पुढील वाटचाल सुरु केली पाहिजे.

कधी कधी आपल्या मनाला श्रेष्ठ अंगाची अंधुक कल्पना असते:ते आपल्या कक्षेतल्या जेष्ठ श्रेष्ठ आर्दशामागे धावत असता, बरेचवेळा त्याला या श्रेष्ठतमअंगाचा स्पर्श होतो. त्याच्या अंतरंगात अगदी खोल हे श्रेष्ठतम अंग, व्यवस्था, शक्ती, तत्व त्याच्या नजरेस पडते;पण ते तत्व स्वत:हून अतिमोठे, अतिउंच, अति दूर असल्याचेही मनाला दिसते, स्वत:हून, स्वत:च्या श्रेष्ठतम  आदर्शां पेक्षा श्रेष्ठ अधिक सारभूत, अधिक जिव्हाळ्याचे ते तत्व आहे. हि गोष्ट मन ओळखते, त्यालाच आपण ईश्वर, आत्मा, चैतन्य असे नाव देतो. मनाला या तत्वाचे अस्पष्ट दर्शन घडल्यावर, ते या ईश्वर तत्वाची ओळख करून घेण्यासाठी त्यांत प्रवेश मिळविण्यासाठी, त्याला स्पर्श करण्यासाठी, त्याच्याशी एकरूप होण्यासाठी त्या आश्चर्यमय रह्श्याशी पूर्ण एकरूप होण्यासाठी किंवा त्यात विलीन होण्यासाठी धडपड करू लागते. हे अति विशुद्ध आहे.  अर्थात सामान्य जीवन आणि त्यातील व्यवहार यांना परिचित असलेल्या कल्पनांनी या तत्वाचे स्वरूप स्पष्ट करणे हे तर मनाला अश्यक्य होते. मनाला व जीवनाला अनाकलनीय असणारे हे ईश्वर तत्व आत्मवाद्याना श्रेष्ठ आदर्शभूत झालेले असते, ते आत्मवादी कोणतीही तडजोड करण्यास तयार असत नाही. ते मानसिक अस्तित्व त्याज्य मानतात. आणि विशुद्ध आत्मिक अस्तीत्वांसाठी तळमळत असतात. हे विशुद्ध आत्मिक अस्तित्व किंवा निर्वाण आम्ही आमच्या मानसिक आणि  भौतिक अस्तित्वाचा विलय करून, त्याच्या मोबदल्यात सुखाने मिळवू शकतो; आणि हेच हे अतिरेकी आत्मवादी करतात. निर्वाण हे त्यांचे ध्येय असते.

Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu