‘मुंबई शहर हादसों का शहर है.’
Like
Like Love Haha Wow Sad Angry

life in metroअसं कुणाला कितीही वाटलं तरी मुंबईत रोज उठून काही हादसे घडत नाहीत. आज किती वर्षे झाली मी मुंबईतले गल्लीबोळ रात्री पालथे घालतो आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्रात काम करत होतो तेव्हा तर पेज थ्रीच कव्हर करत होतो आणि नंतर त्याहून वेगळ्या दैनिकात तर रात्रभर मुंबईत फिरून घटना घडामोडी कॅमेर्‍यात टिपायची असाईनमेण्टच असायची आठवडा आठवडा. एक नेहमीची टॅक्सी करून मी आणि माझ्याबरोबरचा रिपोर्टर मुंबई पालथी घालत रात्रभर फिरायचो.

तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल कदाचित, पण मुंबईत एक चोरबाजार आहे. तो पहाटे साडेचार वाजता उघडतो. या चोरबाजारात कपडे विकायला काही बायका येतात. रात्री एक-दीड नंतर त्या व्हीटी स्टेशनच्या बाहेरच बसलेल्या असतात आपापली गाठोडी घेऊन. त्यांच्याबरोबर त्यांची मुलं असतात, कधी नवरेही असतात. पण या बायका खमक्या. त्यांना मुंबईच्या व्हीटी स्टेशनबाहेर भीती नाही वाटत की कुणी त्यांना त्रास नाही देत. पहाटे चोरबाजाराची वेळ झाली की त्या निघून जातात. दिवसभर त्या काय काम करतात, मला माहिती नाही. पण किती वर्षं झाली मी त्या बायका तिथं पाहतोय. भीतीचा लवलेश नसणार्‍या. आपल्याला त्यांची दया येते, पण त्या मात्र निडर असतात.

आज मुंबईच्या नाइट लाइफवरून एवढा गदारोळ उठला आहे, पण मुंबईचं नाइट लाइफ म्हणजे फक्त इथले डिस्क आणि पब नाही, ते हायफाय लोकांचं एक वेगळं जग आहे आणि त्याहून वेगळं नाइट लाइफ असतं मुंबईच्या रस्त्यावर रोज. काही माणसं फुटपाथवरच राहतात, त्यांचा विचार नाही करत आपण, पण जी माणसं रात्री जागून काढतात मुंबईत त्याचं आयुष्य कसं असतं.? आणि मुख्य म्हणजे रात्री बाहेर पडताना, फिरताना मुंबईत कधी भीती नाही वाटत. असुरक्षित नाही वाटत, सामान्य माणसाला इथं जगावंसं वाटतं, आपण घरी सुखरूप जाऊ असं वाटतं आणि ते खरं मुंबईचं स्पिरीट आणि नाइट लाइफ आहे.

तो निडरपणा येत असावा सदैव जाग्या असणार्‍या मुंबईच्या कल्चरमधून. या शहरात तुम्ही कधीही उपाशी मरत नाही हे त्याच जागेपणाचं एक लक्षण. मुंबईत अंधेरी परिसरात कपूर हॉस्पिटलच्या बाहेर एक पावभाजीवाला असतो. रात्री तीन वाजता जरी तुम्ही त्याच्याकडे गेलात तरी तिथं तुम्हाला उत्तम पावभाजी मिळते. तिची चव अफाट आहे. आता गेल्या काही दिवसांत पोलिसांनी त्यावरही बंदी घातली असेल तर माहिती नाही, पण अनेक जण रात्री तिथं पावभाजी खायला येतात. गप्पा मारतात. रात्रीची शांत मुंबई अनुभवतात. एरवी धावणार्‍या मुंबईत शांत निवांतपणा असतो कुठं.?

Source:  Online News Updates.

Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , ,  • Polls

    महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

    View Results
Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu
%d bloggers like this: