Kolambi Fried Rice :
‘Kolambi Fried Rice’ is similar to pulao where the spices are mixed with the rice. pulaos are largely quicker to make in busy households. basmati rice is the perfect choice for preparing this dish.
साहित्य :- तीन वाट्या बासमती तांदूळ, कांद्याची पात, चार मोठे कांदे, दोन गाजरे, १५० ग्रम कोबी, तीन अंडी, दोन डाव तेल, तीन टि.स्पून सोया सोस, आणि टोमाटो सॉस एक वाटी सोललेली कोळंबी, पाव चमचा हळद, मीठ
कृती :- कोलंबी साफ करून स्वच्छ धुवून ठेवावी, त्याला थोडे मीठ आणि हळद लावून ठेवावे, थोड्या तेलावर तांदूळ परतून घ्यावेत, त्यात गरम पाणी घालून नरम असा भात करून शिजवून घावा. एका पातेल्यात तूप घालून त्यात कोलंबी तळावी. तळल्यानंतर ती बाजूला ठेवावी. नंतर त्याच पातेल्यात भाज्या घालून परताव्यात. शिजल्या नंतर मिठ्व मिरेपूड घालावी आणि जरा परतावी. तयार झालेला भात ताटात घालुन मोकळा करून घ्यावा. तो भात त्याच पातेल्यात घालून उलथण्याच्या टोकाने ढवळवा. त्यात सोयासॉस व टोमाटोसॉस घालून गरम तव्यावर भाताचे पातेले ठेवावे. वाफ आल्या नंतर हलक्या हाताने ढवळावे. वाढताना भातावर तळलेली कोळंबी घालावी.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर.
नागपूर ९