‘जुन्याच’ प्रवासातील ‘नव्या’ वळण वाटा..
Like
Like Love Haha Wow Sad Angry

junya-prawasatil-nwya-walan-wata for articles

||तदेव लग्नंम||
‘जुन्याच’ प्रवासातील ‘नव्या’ वळण वाटा..junya prawasatil nwya walan wata
* दिसण, घर, कर्तुत्त्व, यावर मुला-मुलींची लग्ने ठरतात. खूप वरवरच्या गुणांकडे रोखलेली नजर स्वत:ला खोलात शोधण्यासाठी झुकत नाही. मी कशी आहे  हे ओळखण्याआधीच एक अपरिचित व्यक्ती आयुष्याचा जोडीदार म्हणून पुढे येतो. कोडकौतुकाने लग्न तर होतं! पण एकमेकां सोबत सहजीवन फुलविताना स्वत:ची अडवणूक करणाऱ्या अनेक अडचणी दोघांसमोर उभ्या ठाकतात. मग एकमेकांचे गुण दोष काढून सहजीवन विस्कळीत होतात. त्या अगोदर ”स्व:ओळख” हि मुलभूत पायरी न ओळखता लग्नाची उडी घेतल्यावर दुसर काय होणार?
* आपल्या आयुष्याचा तीन चतुर्थांश भाग ”लग्नित आयुष्यान” व्यापलेला असतो. पण अजूनही घर घरात लग्न या विषयावर महत्वाच्या कालावधीत मोकळे पणान संवाद होत नाही. पण वास्तव हे आहे कि लग्न हि आयुष्यातली महत्वाची घटना, अविस्मरणीय क्षण किंवा प्रसंग एवढ्या विशेषणापुरता मर्यादित ठेवण योग्य नाही. लग्न हि एकमेकांना घडविणारी, मिळून सुंदर सहजीवन फुलवणारी ”संस्था” आहे. यात प्रवेश करण्या अगोदर स्वत:ला ओळखण हि प्राथमिक समज आहे. स्वयं स्वीकार म्हणजे सर्वात आधी माझ माझ्याशी असलेल नात कसं आहे? पुढल्या वैयक्तित वाढी करिता माझ्या मध्येबदल करण्याची लवचिकता माझ्या मध्ये आहे काय? हि विचारधारा स्व ओळखीचा महत्वाचा टप्पा आहे. खरतर जोडीदार निवडीच्या कल्पना स्पष्ट नसण्याच कारण हे स्वओळखीच्या अभावातच दडलेलं असत.याकरिताच म्हटलेलं आहे कि स्वओळख हा महत्वाचा टप्पा आहे.
* स्वओळख म्हणजे सध्या शिक्षणाचे उपलब्ध असलेले अनेक पर्याय. जशे नोकरी, करिअर, स्वत:ची क्षमता, मर्यादा, आवडनिवड, स्वत:चा कल, स्वत:ला मिळणारा मोबदला, स्व:चा आनंद ह्यागोष्टी साध्य होण्यासाठी केला गेलेला विचारपूर्वक विचार किंवा अभ्यास म्हणजे स्व:ओळख होय.
आपल्यातील  ”मी ” ओळखणे, मी च्या चार बाजू असतात, शारीरिक, मानसिक, सामाजीक आणि बौद्धिक, *शारीरिक, म्हणजे रंग, उंची, बांधा, चेहऱ्याची ठेवण, डोळ्यातील रंग, वै *सामाजिक म्हणजे, कौटुंबिक स्तर, कटुंब, नाते सम्बंध, समाज, ई.
* मानसिक म्हणजे, आपले विचार, गुणदोष, भावना, भावना हाताळण्याची पद्धत आणि त्या नुसार होण्यार्या वर्तनावर अवलंबून असतो.
* बौद्धिक म्हणजे शिक्षण, नौकरी पात्रता, हे होय. मात्र लग्न जुळविताना शारीरिक व मानसिक या दोन वर भरदिला जातो.
मानसिक बघितल्या जात नाही, तेव्हा खर जीवन नेमकं याच भागावर अवलंबून असतं. हा मानसिक मी जर निरोगी असेल तरच ईतर मी योग्य प्रकारे काम करतात. हा ‘मी’ संस्कारांनी घडत असतो, हे ओळखणे अतिशय गोंधळात घालते. पण मी ओळखणे अशी कोणतीही शिक्षण पद्धती अभ्यास क्रमात नाही. या विषयाची थोडीशी तरी तोंड ओळख.शालेय अभ्यास क्रमात हवी. तरच स्वत:मध्ये डोकावून बघण्याची वृत्ती हळूहळू निर्माण होईल. आणि तारुण्याच्या उंबरठ्यावर स्वत:च्या गुणदोषाबद्दल सजगता येईल. स्वत:मधली बलस्थान आणि कमकुवत दोष समजतील. त्याचा स्वीकार करून दोष कमी करता येईल. आपली ओळख आपल्याला व्हायला लागेल. आपल्यातल माणूसपण आपल्याला ओळखता आल तरच लग्न संस्थेत प्रवेश करताना जोडीदाराची डोळस निवड करण सोप जाईल कारण जोडीदाराचीही एक माणूस म्हणून ओळख व्हायला हवी. तसेच येणाऱ्या परिस्थिती नुसार, समोरच्या व्यक्ती नुसार स्वत:मद्ये बदल करण्याची व समजून घेण्याची क्षमता. आपल्या मध्ये आहे कि नाही याचा अभ्यास हवा. स्वत:बद्दलच मत अन अपेक्षा तपासण अश्या अनेक गोष्टी स्वत:ची परिपूर्ण ओळख होण्यासाठी परिमाण आहे. लग्न वेशीवर चढताना आजही जोडीदार निवडीचे निकष  पारंपरीकच आहे. रंग, रूप, पैसा, पत, प्रतिष्ठा, शिक्षण वैतांत्रिक बाबीच तपासल्या जातात. दैनंदिन जीवनात जगताना आपला जोडीदार ”माणूस” म्हणून कसा आहे. त्याचा स्वभाव कसा आहे. हे पारखण्याची संघी आजही आपल्या पारंपारिक पद्धतीत नाही. तरीही स्वत:ची ओळख जर अधिक स्पष्ट, समग्र झाली असेल तर जोडीदाराला पारखंण त्यातल्या त्यात सोप जाईल हे अतिशय महत्वाचे आहे कि नाही? ते ठरवा तेव्हाच लग्न वेशीवर चढा.
Source : Marathi Unlimited.
Like
Like Love Haha Wow Sad Angry
, , , , , , , , , , • Polls

  महाराष्ट्रातील भाजप आणि शिंदे सेना युती टिकेल का ?

  View Results
1 Comment. Leave new

 • ajay kuthe
  07/05/2012 5:18 AM

  this is just a awesome article… i really like this…thanks for sharing it… its a part of our life….. we all must read the same….

  Reply

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu