jiwanacha-uddesh -Aatachya jivanacha aanad ghevuya. … insurance agent je sangat hota ti paddhat bari nasel, tyacha uddesh tyacha fayada karane ha asel pan …
जीवनाच्या उद्देशा बद्दल काय विचारले जाते? त्याचे विवेचन.
जीवनाचा उद्देश तो काय, असा प्रश्न प्रत्येकाला लवकर असो व उशिरा असो, पण येतोच आमचे राहणीमान सुधारण्यासाठी, आमच्या कुटुंबाची तरतूद करण्यासाठी काबाडकष्ट करणे व नंतर ७०, ८० वर्षे झाले कि मरणे व मग तेथून पुढे कायमचे अस्तित्व वीरहित व्हावे यासाठी हे सर्व काही आहे का? असे जर वाटत असेल तर ” जगावे, मुले असावी,आनंदी व्हावे व शेवटी मरावे”. या परत्वे जीवनात असा दुसरा उद्देश नाही. पण हे खरे आहे का? आणि मृत्यू हा सर्व गोष्टींचा अंत करतो का?
~~~भौतिक संपत्ती संपादणे हे जीवनाचा उद्देश का पुरा करू शकतं नाही?
पूर्व तसेच पाश्चीमात्य देशात राहणाऱ्या अनेकांना वाटते कि जीवन जगण्यामागील प्रमुख उद्देश म्हणजे भौतिक संपत्ती मिळवावी हा आहे. हे आनंदी व अर्थभरित जीवनाकडे निरवू शकते असे त्यांना वाटते. पण जे मुळातच सधन आहेत त्यांच्या बद्दल काय? हैरी ब्रूस या क्यनडीयन लेखकाने म्हटले ”गोंधळलेल्या स्थितीत वावरणारा श्रीमंतांचा वर्ग म्हणतो कि, ते आनंदी नाहीत” त्यांनी पुढे म्हटले;” उत्तर अमेरिकेला भयंकर पछाडलेले आहे अशी चाचणी दाखवून देते…..या जगात कोणी आनंदी आहे कां? त्या मागील गुपित काय आहे? ~~~जिमी कॉर्टर या माजी अमेरिकन अध्यक्षांनी असे म्हटले:”आम्हा पाशी काही गोष्टी असणे व त्यांचा उपभोग घेणे हे आम्हाला हव्याहव्याश्या वाटणाऱ्या अर्थभरित-पणाची तृप्ती देत नाही ……भौतिक गोष्टींचा साठा करणे, जेथे आत्मविश्वास किंवा उद्देश नाही त्या पोकळ जीवनाला भरून टाकू शकत नाही. तसेच ”मी मज बद्दल तसेच माझे जीवन याबद्दल गेली कित्येक वर्षे सूक्ष्मपणे सत्याचा शोध घेत आहेत,आणि मज प्रमाणे मला माहित असणारे ईतरही असेच करीत आहेत कि, ”आम्ही कोण आहोत ?आमचा खरा उउद्देश काय आहे”?
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited.
1 Comment. Leave new
Very Useful article…. thanks for posting….