जातकर्म व नामकरण
पुत्र जन्म झाल्याबरोबर नळ छेदणापूर्वी जातकर्म संस्कार करावा. नाम करण अकराव्या, बाराव्या किंवा तेराव्या दिवशी करावे. ह्या दिवशी नक्षत्र वै. पाहण्याची गरज नाही. तथापि अमावास्या, ग्रहण, वैधृती, व्यतिपात वै. कुयोग नसावे. कारणपरत्वे १२|१३ या दिवशी ते न घडेल तर पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, अनुराधा, जेष्ठा, मृग, मूळ, तिन्ही उत्तरा, घनिष्ठा या नक्षत्री व शनी-मंगळ खेरीज करून ईतर वारी स्थिर लग्नावर बालकचे नाव ठेवावे.
Source : Marathi Unlimited.