टीम अण्णा गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत असली तरी या आंदोलनाला पुरेसा प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळं सरकारनंही टीम अण्णांच्या उपोषणाकडं दुर्लक्ष केल्याचं चित्र निर्माण झालं होतं. अण्णा आज जंतरमंतरवर दाखल झाले आणि त्यांच्या आगमनानं या आंदोलनाला आणखीन बळ मिळालं. स्वत: अण्णांनीच मंचावर येऊन उपोषण सुरू केल्यानं समर्थकांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली. अण्णा आल्यानं आंदोलनात चैतन्यच निर्माण झालंय. त्यामुळं आता केंद्र सरकार अण्णांच्या आंदोलनाची दखल घेतं का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
Source : Marathi News