जन्म नक्षत्र कोठें पडले तें पाहणे




Like
Like Love Haha Wow Sad Angry

nama nakshatra kase mojaweसूर्य नक्षत्रापासून जन्मनक्षत्रा पर्यंत [जन्म नक्षत्रसुद्धा] नक्षत्रे मोजून पुढे लिहिल्या प्रमाणे त्यांची स्थाने जाणावी. पहिली तीन नक्षत्रे मस्तकावर, दुसरी३ मुखावर, प्रत्येक खांद्यावर- १|१, बाहुंवर१|१, तळहातांवर१|१, हृदयावर५, नाभीवर १, गुह्यावर१, प्रत्येक जानुवर १|१, व प्रत्येक पावलांवर ३|३ या प्रमाणे २७ नक्षत्रांची व्यवस्था जाणावी.  उदारणार्थ,सूर्य नक्षत्रांपासून जन्म नक्षत्रानपर्यंत ७ नक्षत्रे झाली, अशी कल्पना करा, यांतून ३ मस्तकावर, ३ मुखावर, अशी ६ नक्षत्रे गेली. सातवे नक्षत्र स्कंधावर आले म्हणून जन्मनक्षत्र स्कंधावर पडले असे जाणावे. स्रियांची नक्षत्र विभागणी निराळी आहे, ती अशी कि ३ मस्तकावर, ७ मुखावर, ८ स्तनांवर, ३ हृदयावर, ३ नाभिवर, व ३ गुह्यावर. जन्म नक्षत्र तळ हस्तावर गुह्यावर व पावलांवर पडले असतां अशुभ व अन्य स्थानीं पडले असता शुभ मानिलेले आहे.

 

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu