लंडन ऑलिम्पिक हे भारतीयांसाठी आत्तापर्यंतचं सर्वात महत्त्वाचं ऑलिम्पिक आहे. यंदा भारताचे तब्बल ८३ खेळाडू देशाला मेडल मिळवण्यास झुंज देताना दिसतील. यासाठी भारतीय खेळाडू जी-तोड प्रयत्न करतायत. लंडनच्या ऑलिम्पिक पार्कवर या खेळाडूंची परेड दिली. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय दलाचं नेतृत्व केलं कुस्तीपटू सुशील कुमारनं… सुशीलनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला ब्राँझ पदकाची कमाई करुन दिली होती. या ८३ खेळाडूंवरच एक अब्जाहूनही अधिक भारतीयांच्या आशा आहेत. भारतीयांच्या अपेक्षा आपल्या खांद्यावर घेऊन हे वीर आपलं आणि सर्व भारतीयांच स्वप्न पूर्ण करण्याच्या हेतूनं आपल्या लक्ष्याकडे वाटचाल करतायत.
Source : Marathi News.