वाढदिवशी..औक्षण कसे करावे?




how-to-clebrate-happy-birthday Feb 25, 2014 – For the most part, my birthday celebration is in my hands. … cream cake accompanied by a sweet rendition of “Happy Birthday” on the ocarina.

okshawant whya हल्ली आपल्या कडील वाढ दिवस करण्याच्या पद्धती बर्यापैकी बदललेल्या आहेत. वाढ  दिवस कसा साजरा करावा हा प्रत्येकाचा वैय्क्तिक प्रश्न असला तरी आपल्या  संस्कृतीत  वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती मागे नेमका कोणता अर्थ आहे हे समजून घेणे   महत्वाचे आहे. आपण ज्याचे वाढदिवस करतो. त्याचे औक्षण करतो. हे औक्षण तुपाचे  निरांजन, सुपारी, सुवर्णमुद्रा, अक्षता, आणि कापूस अश्या पाच गोष्टीनी केले जाते. या  प्रत्येक गोष्टीं मागे. काही ना काही गर्भीतार्थ आहे. ते पाहू साजूक तुपाचा दिवा म्हणजे धनलक्ष्मी, प्रकाश याचा अर्थ  म्हणजे त्या  व्यक्तीच्या आयुष्यतील अंध:कार नाहीसा होऊन प्रकाश आणि संमृद्धी यावी. अगोदर निरांजनाने त्याला ओवाळायचे. सोन्याने ओवालण्याचा अर्थ सोन्या सारखे निष्कलंक आणि झळझळीत आयुष्य त्याला लाभावे हा होय. सुपारी सारखे टणक आणि अविनाशी आयुष्य लाभावे. म्हणून सुपारीने औक्षण करावे. तर सर्वात शेवटी  कापूस ओवाळून डोक्यावर ठेवायचा आणि म्हणायचे कापसासारखा म्हातारा हो. अक्षता या शब्दाचा अर्थ अविनाशी असा असल्याने तबकातील अक्षता कपाली लावून डोक्यावर टाकतात. ओउक्ष्ण करण्या मागे ईतका उदात्त उद्देश आहे. तर आता त्या मागचा शास्त्रीय उद्देश लक्षात घेऊन ओउक्ष्ण करणार कि केक कापणार?

Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड