सापडली हिटलरची कार
एका व्हिंटेज कार व्यावसायिकाने आपल्या ग्राहकासाठी इंटरनेटच्या माध्यमातून खरेदी केलेली कार चक्क हिटलरच्या निकटच्या अधिका-यांसाठी तयार केलेल्या खास कारपैकी एक निघाली आहे.
ही कार खरेदी केल्यानंतर तिच्यात काही दुरुस्ती करणे गरजेचे होते. त्यासाठी त्याने या कारची उत्पादक कंपनी असलेल्या मर्सिडिझशी संपर्क साधला. कंपनीने त्याला कारचा सिरियल क्रमांक विचारला. त्यानंतर कंपनीकडून मिळालेले उत्तर अवाक करणारे होते. ही कार हिटलरच्या ताफ्यातील असल्याचे झेनॉप ट्यून्सर या विक्रेत्याला कंपनीने सांगितले आणि ही कार प्रसिद्धीच्या झोतात आली.
ही कार १९४२मध्ये तयार करण्यात आली असून ३२० कॅब्रिओलेट डी या प्रकारातील तिची बांधणी आहे. दुस-या महायुद्धाच्या काळात हिटलरच्या अत्यंत निकटच्या वर्तुळातील अधिका-यांसाठी ती तयार करण्यात आली होती. अशा फक्त आठ कार तयार केल्या गेल्या होत्या. ही कार युद्धकाळात वापरली गेल्याच्या अनेक खुणा त्यावर आहेत. त्यावरील नाझींचा ध्वज काढून टाकला आहे, त्याच्या खुणा अद्यापही तेथे दिसतात.
Source : Online News.