geeteche-mahatwa-ani-artha for marathi articelas
गीतेचे महत्व व सारभूत अर्थ !
गीता लिहिली गेल्या नंतर आज पर्यंत दीर्घ युगे, कालखंड उलटून गेलीत. तरी गीता कालीन विचारांत आणि अनुभवांत मोठमोठे बदल झालेले आहेत. तरी बदला नंतर व दीर्घ काळानंतरआजच्या मानवी मनाला गीतेचा आध्यात्मिक दृष्ट्या उपयोग काय आहे? तिच्या आजच्या मानवास काय संदेश आहे? तिचे व्यवहारिक मूल्य काय आहे.? मानवी मन नेहमी पुढे पुढे जात असते; ते आपला दृष्टीकोन दर्शन स्थान बदलीत असतात. आणि तदनुसार आपल्या विचारधनात भर घालीत असतात. मानवी मनातील या बदलांचा परिणाम भूतकालीन विचार पद्धतीला रद्द करण्यात होतो; पण ह्या कालबाह्य न होता टिकविल्या गेल्या तर त्यात फेरफार व विस्तार केला जाऊन त्यांच्या मूल्यात स्पष्टकिंवा अस्पष्ट असा सूक्ष्म बदल केला जातो. तरी गीतेतील प्राचीन विचार पद्धती कालांतराने रद्द न होता स्वाभाविकपणे टिकून आहे. त्या प्राचीनकाळी तिच्यात जो ताजेपणा होता जवळ जवळ तितकाच ताजेपणा आजही तिच्यात भासतो; कारण या गाभ्याचा, सारतत्वाचा अनुभव केंव्हाही आजही आम्हाला घेता येतो. भारतात ज्या थोर संप्रदायांना धार्मिक विचार-व्यापारावर सत्ता गाजविण्याचा सर्व श्रेष्ठ अधिकार आहे, अश्या संप्रदायात गीता संप्रदायाची आजही गणना होते.
* गीतेची शिकवण अत्यंत मोलाची आहे. तिचा प्रभाव तात्विक किंवा बौद्धिक नसून विचार आणि आचारा वरही आहे. भारता बाहेरही सर्वत्र जगांतील एका थोर धर्म ग्रंथाचा मान गीतेला दिला जातो. म्हणतात कि युरोपीयांना गीतेतील आध्यात्मिक साधनेचे गूढ चांगलेसे उमगत नाही; पण तिच्यातील विचार प्रणाली त्यांना चांगली समजते. गीतेंत मांडलेल्या विचारांत, प्रगट केलेल्या सत्यांत, आजही जो जिवंतपणा व प्रभावी तेज दिसते त्याचे मूळ कशात असावेबरे?.
**गीतेच्या तत्वज्ञानाच्या योगाच्या मध्यवर्ती गाभ्यांत हे मूळ आहे, हा गाभा, प्रमुख आकर्षक विचार गीतेच्या आरंभी, शेवटी आणि मध्ये अखंडपणे मांडलेला आढळतो. हा आकर्षक विचार म्हणजेमानवाचा बाह्य वास्तव जीवनव्यापार व ईतर व्यवहार आणि अंतरंगत अनुभवास येणारे सर्व श्रेष्ठ अध्यात्मिक सत्य यांची एकता साधण्याचा विचार होय, पण तरी अध्यात्म आणि व्यवहार यात तडजोड करून वागण्याची प्रथा आहे. पण हि तडजोड काही बाबतीत अंतिम सामाधान कारक उत्तर होऊ शकत नाही. अध्यात्म्याचे नैतिक रुपांतर करण्याचीही प्रथा सामान्य जनात आहे, या अध्यात्म मूलक नीतीचा, वर्तनाचा एक नियम या दृष्टीने उपयोग होतो परंतु हा नियम एक मानसिक तोडगा आहे, याचा जीवन सत्य, आत्म सत्य यांचा काही तो पूर्ण व्यवहारिक समन्वय होऊ शकत नाही.
*** गीतेचें म्हणणे असे आहे. कि सामाजिक कर्तव्य, समाजातील व्यक्तीने करीत असावे,सर्व सामान्य व्यवहारांत ज्या व्यक्तीला भाग घ्यावा लागतो, त्याव्यक्तीने तिचा सामाजिक धर्म पाळला पाहिजे. असा गीतेचा आग्रह आहे. सर्वंश्रेष्ठ आध्यात्मिक नैतिक आदर्शाचा एक भाग अहिंसा आहे, आणि आध्यात्मिक मोक्षाचा एक मार्ग संन्याशाचा कर्म त्याग आहे हेहि गीतेला मान्य आहे. पण गीतेचे वैशिष्ट हे आहे कि, या तिन्ही अनोन्य विरोधी कल्पनांच्या पलीकडे मोठ्या धैर्याने पाऊल टाकून–एकमेव दिव्य पुरुषाचा ईश्वराचा अर्थ पूर्ण अविष्कार हे जीवनातील सर्वं व्यवहाराचे स्वरूप आहे. असे सांगून ती संपूर्ण जीवनाचे समर्थन करते व असे स्पष्ट विधान करते, कि पूर्ण मानवी कर्म आणि पूर्ण अध्यात्मिक जीवन यांत विसंवाद असण्याचे काहीच कारण नाही. अनंताशी ज्या जीवनाचे ऐक्य साधले आहे, सर्वोत्तम आत्मतत्वाशी जे जीवन संवादि आहे, पूर्ण ईश्वरतत्वाची ज्या जीवनात अभीव्यक्ती आहे असे पूर्ण अध्यात्मिक जीवन आणि पूर्ण मानवी कर्म एकत्र असू शकतात. अविरोधाने एकत्र नांदू शकतात. असे सांगते; गीतेतील संघर्ष [लढाई ] म्हणजे धर्मव नैतिक भावना एक बाजू व दुसरी म्हणजे अन्याय व असत्य होय. धर्म नैतिक भावना हा कर्मवीर एक राजपुत्र योद्धा व लोकनेता आहे. त्याने सत्याचे व न्यायचे नवे युग नवे साम्राज्य स्थापन करावे, हाच निष्कर्ष ठेवून लढाई अध्यात्मिक पातळीवर लढावी. कर्त्या पुरुष्याला सामाजिक कर्तव्याचा धर्म एक प्रेरणा देतो व आदर्श अध्यात्मिक नीतीधर्म दुसरी प्रेरणा देतो या दोन प्रेरणांचा संघर्ष टाळणारी तिसरी एक प्रेरणा ती म्हणजे कर्त्या पुरुषाला आत्यंतिक कर्मसंन्यासा कडे वळविते पार्थिव जीवन, या जीवनाचे सर्वं हेतू या जीवनाची सर्वं कर्मे त्याने टाकून द्यावी.आणि अश्या स्वर्गीय किंवा विश्वातील अवस्थेच्या प्राप्ती साठी झटावे. ज्या अव स्थेत शुद्ध आध्यात्मिक जीवन जगता येईल असें हि तिसरी प्रेरणा सांगत असतें. मानवीजन्म जीवन, मरण हा एक अर्थशून्य गोंधळ आहे, आभास आहे आणि त्याचा त्याग करून पलीकडील विश्वातील स्वर्गीय अवस्था गाठ्ण्यानेच शुद्ध अध्यात्मिक जीवन जगता येणार आहे, असा या तिसऱ्या प्रेरणेचा आग्रह आहे.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited