संगणकावर काम करताना सजगतेचां ईशारा.
संगणकावर सतत बसावे लागल्यामुळे. बऱ्याच जणांना डोळ्याचा त्रास होऊ लागतो. डोळ्यांची जळजळ होणे डोळ्यां मधून पाणी येणे अश्या तक्रारी दिसून येतात. अश्या व्यक्तींनी संगणका समोर काम करताना. काही बाबतीत काळजी घ्यावी. संगणकाची स्क्रीन आपल्या डोळ्यांच्या उंचीच्या किंचित खालच्या पातळीत राहील याची काळजी घ्यावी. दर अर्ध्या तासां नंतर एक ते दोन मिनिटे डोळे बंद करून विश्रांती घ्यावी. किंवा डोळ्यांवर थंड पाण्याचा शिंतोडा द्यावा. सुरवाती पासूनच डोळ्यांचा त्रास असणार्यांनी पालथे झोपणे किंवा डोळ्यांवर दाब पडेल अश्या पद्धतीने झोपणे टाळावे. घरी परतल्या नंतर परत टी.व्ही. च्या समोर बसने टाळावे.रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यांवर थंड दुधात किंवा गुलाबजलात कापूस भिजवून त्याच्या घड्या ठेवाव्यात. अश्या प्रकारे प्राथमिक उपचार करून बघावेत. जास्त त्रास असल्यास तपासणी करावी व औषधोप्चार करावा.
Source : Marathi Unlimited.