डिझेल ५ रुपयांनी महागण्याचे संकेत !
डिझेलची दरवाढ राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीनंतर होण्याचे संकेत मिळत असून, ही दरवाढ किमान पाच रुपयांची असेल अशी दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही दरवाढ एकतर ठोस किंमत वाढीनुसार होऊ शकते; अथवा डिझेलची किंमत स्थिर ठेवण्यासाठी देण्यात येत असलेल्या अनुदानात केंद्र सरकार कपात करण्याची शक्यता आहे. मात्र, यापैकी कोणत्याही शक्यतेचा परिणाम हा दरवाढीतूनच प्रतिबिंबित होईल. डिझेलच्या किमतीही नियंत्रणमुक्त करण्याची चर्चा असली तरी अद्याप तसे झालेले नाही. गेल्या दोन महिन्यात क्रूड तेलाच्या किमती जरी प्रति बॅॅरल १00 डॉलरच्या खाली असल्या तरी, डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरलेल्या मूल्यामुळे कंपन्यांच्या ढोबळ खर्चात वाढ झाली आहे.
Source : Online Team.