चीनचे तीन अंतराळयात्री १३ दिवस अवकाशात वास्तव्य करून सुखरूपपणे पृथ्वीवर परतले आहेत. या अंतराळवीरांनी आपले यान अवकाशातील तियाँगाँग प्रयोगशाळेशी जोडण्याचा प्रयोग यशस्वी केला व देशाला अमेरिका आणि रशिया यांच्या पंक्तीत नेऊन ठेवले. १३ दिवस अंतराळात राहून पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करताना या यानाला प्रचंड उष्णता व घर्षण यांचा सामना करण्यात आला. यानाला जोडलेली धातूची छत्री पृथ्वीपासून १0 कि.मी. उंचीवर उघडली व यान पृथ्वीवर उतरले. पृथ्वीवर आल्यानंतर यानाबाहेर येण्यास अंतराळवीरांना एक तास लागला. कमांडर जिंग हैपिंग प्रथम बाहेर आला व त्यापाठोपाठ महिला अंतराळवीर लिऊ वांग बाहेर पडली. तिन्ही अंतराळवीर बाहेर पडताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
Source : Online Source: