‘ब्रेट ली’नं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. ली यानं २०१० मध्ये टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती आणि आता पायाच्या दुखापतीमुळे त्याला वन-डे क्रिकेटलाही अलविदा करावा लागलाय. ऑस्ट्रेलियाच्या युवा बॉलर्सचा टीममध्ये मार्ग मोकळा करण्यासाठीच आपण क्रिकेटला गुडबाय करत असल्याचं ली नं सांगितलंय. ब्रेट ली नं २२१ वन-डे मॅचेसमध्ये ४.७६ च्या इकॉनॉमी तब्बल ३८० विकेट्स घेतल्या आहे. १६० किमीच्या वेगानं बॉल टाकणाऱ्या या ऑस्ट्रेलियाच्या फास्ट बॉलरनं क्रिकेटविश्वात आपली वेगळी दहशत निर्माण केली होती.
Source : Marathi Updates.