भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांची विशेष यंत्रणेमार्फत चौकशी करावी, खासदारांवरील केसेसचा जलदगती न्यायालयाद्वारा निपटारा करावा व सशक्त लोकपाल विधेयक मंजूर करावे आदी मागण्यांसाठी टीम अण्णा उद्यापासून पुन्हा जंतरमंतरवर आंदोलन करणार आहे. जंतरमंतर मैदानावर २५ जुलैपासून टीम अण्णांचे आंदोलन सुरू होत आहे. या आंदोलनात सहभागी होण्यासाठी हजारे यांचे आज दिल्लीत आगमन झाले. ते म्हणाले, प्रकृती अस्वस्थतेमुळे मी यावेळी उपोषण करणार नव्हतो; परंतु लोकांचा प्रतिसाद आणि भ्रष्टाचाराविषयी असलेली जनभावना लक्षात घेऊन मी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु त्यासाठी सरकारला चार दिवसांची मुदत आहे.
Source : Marathi Unlimited.