amani-nahi-bhw for articles
मनी नाही भाव ….
निर्मल आचरण हीच खरी देश भक्ती. पण आजकाल मनात कुठलाही भक्ती भाव नसताना देवदर्शन करणारे. समूह बरेच दिसतात, मंदिराच्या परिसरातील रांगा लागतात त्यामुळे वेळे अभावी देव दर्शनासाठी नंबर लावण्यातही भष्टाचार चालताना दिसतात. तसेच मोठमोठे ब्र्ष्टाचार करूनही देवळात जाऊन दान कर्णार्यांवर देव खरचं प्रसंन्न होत असेल काय?
”भक्त जातो देवापाशी चित्त त्याचे चपलापाशी” आता त्याची पण निस्वार्थ सेवा दिली जाते. देव शोधायला देवळात जावे लागत नाही, तो जनमाणसातच शोधावा लागतो असे संतांनी सांगून गेले आहे तरी देव शोधायला आपण देवळातच जातो, हा संतांच्या विचारांचा अपमानच नव्हे काय? संतांनी सर्व गोष्टीत देव पहिलात. आज देशात अशी परिस्थिती आहे कुणाला राहण्याकरिता साधी झोपडी नाही, खाण्याकरिता अन्न नाही. पण देवाला मात्र अलिशान मंदिरांसाठी मोठेमोठे परिसर, दागदागिने सोने चांदीची भांडी मिळतात. स्वादिष्ट मिठाया, पण का हिबुद्धी देवानीच दिली असणार?.. त्या दागिन्यांनी देव खरचं प्रसंन्न होत असेल का?….. तेव्हा या सर्व धनदांडग्यांनी देवळां पेक्षा मानवात देव पाहून त्यांसाठी निशुल्क दवाखाने, वाचनालये, नास्वार्थ वृत्तीने शाळा, कॉलेज, वृद्धाश्रम, अनाथआश्रम, काढून सेवा भाव ठेवला तर हे भक्तीचे स्वरूप नाहीत कां? यात देव प्रसंन्न होणार नाही काय?.
पांडिताचा गोरख धंदा…
आजच्या काळात देवांच्या व देवळांच्या नावाने पुजार्यांना फार उधान आले आलेले आहे, कोण कुठून नवनवीन पुजारी तयार होत आहे, ज्यांना देवपूजेचे साधे ज्ञान ही नाही, मंत्र आरत्या, श्लोक, यांचे उच्चार करता येत नाही, असले पंडीत सामान्य जनतेला कधी ग्रह देवतांचा तर कधी कुलदेवतेचा तर कधी पितृ देवांचा दोष { प्रकोप } सांगून त्यानावाखाली वाटेल तसा पैसा उखडन्याचा गोरख धंदा भरभराटीला येताना दिसत आहे. हि आमजनता अंधश्रद्धेच्या नावाखाली त्यांना बळी पडत आहे. व चाणक्य नीतीचे पंडीत मालामाल होताना दिसत आहे. तेव्हा या जनतेला नाम स्मरणातच भक्तिमार्ग आहे हे पटवून देण्याची गरज वाटत आहे.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..
Source : Marathi Unlimited
1 Comment. Leave new
mani nahi bhav ani deva mala pav….
dev ashann bhetaycha nahi re reeee
dev bajarcha bhaji pala nahi ree reee……………