Aloo Chat :
Aloo Chaat, which is a spicy potato snack. Aloo chaat is a popular snack found at north Indian street side sellers. TThis is one of the very few chaats served without any chutney.
साहित्य :- पाव किलो एकदम लहान बटाटे, एक मोठी वाटी दही, एक चमचा जिरे पूड, अर्धा चमचा पुदिना पावडर, उभ्या चिरलेल्या दोन मिरच्या, प्रत्येकी दोन चमचे चिंचेची चटणी आणि हिरवी मिरचीची चटणी, बारीक चिरलेला एक कांदा, लहान चमचा भर चाट मसाला, दोन मोठे चमचे तेल, चवी नुसार मीठ.
कृती :- पाण्यात थोडे मीठ टाकून बटाटे उकडून घ्यावे. साली काढून त्यांना टोचे द्यावे. कढीईत तेल टाकून बटाटे गरम झाल्यावर त्यात बटाटे टाकावेत. गुलाबी होई पर्यंत परतावे, नंतर दुसऱ्या कढईत, थोडे तेल टाकून त्यात गरम झाल्यावर. जिरे, पुदिना टाकून बटाटे सोडावे. परतताना त्यात चवी नुसार मीठ घालावे तें थंड झाल्यावर त्यात चाट मसाला टाकावा. प्लेट मध्ये हे बटाटे घेऊन त्यावर प्रथम दह्यात कांदा, हिरवी मिरची काप दिलेली व हिरवी चटणी मिसळून हे मिश्रण त्या बटाटयांवर टाकावे. नंतर चिंचेची चटणी वरून टाकून खाण्याकरिता द्यावे.
Source :
Marathi Unlimited
हेमावती म. भेंडारकर.
नागपूर ९
1 Comment. Leave new
wowwww tondala pani sutal…..