अध्यात्म कि खोज




Like
Like Love Haha Wow Sad Angry

adhyatma-ki-khoj Spirituality, Meditation and Divine Knowledge or “Adhyatma Gnyan” in particular has primary aim of converting Man to God, but he needs to become “True …
प्रजापिता ब्रह्म कुमारी विश्व विद्यालय.

adhyatma ki khoj परमपिता शिव परमात्म्याने    स्व:प्रजापिता ब्रह्मया द्वारे गीतावरिल  ज्ञानदृष्ठि. गीते मधील वर्निलेले धर्म युद्ध हे मानवाला पवित्र  बनवन्याकरिता  आहे त्याचा हिंसेशी मुळीच संबंध  नाही.कारण एका  प्रसंगी भगवंताने असे  म्हटले आहे की ”काम, क्रोध,लोभ  नरकाचे  द्वार” तेव्हा विचार करण्या  सारखी गोष्ट आहे की ज्या युद्धा पासून    स्वर्गाची प्राप्ति होते ते ‘युद्ध  हिंसात्मक’अथवा क्रोध मुलक असणे शक्य  नाही. अजुन या संदर्भात जो ‘क्षत्रिय’ म्हणून उल्लेख झालेला आहे तोही    जन्मा वर आधारित एखाद्या जातीचा वाचक नसून ज्ञानाद्वारे ‘माया’  शी युद्ध करणारा ‘वीर’ किंवा योद्धा याचा बोधक आहे. गीतेत सांगितले  आहे की जर तू माझ्या ठायी मन स्थिर करशील तर सारा दुर्ग जिंकशील व माझ्या कृपेने तरुण जाशील. येथे स्थूल रितीने एखादी नदी पार करूंन जाण्याची गोष्ट नसून ज्ञाना द्वारे संसाररूपी विषय सागर किंवा दू:खसागर पार करण्या विषयी सांगितले आहे. याच प्रकारे एखादा विशिष्ट दुर्ग जिंकण्याची गोष्ट नाही तर कठीण परिस्थितीवर मात करण्याची गोष्ट आहे. तसेच येथे ‘क्षत्रिय’शब्दही स्थूल धनुषबाण घेउन मानवी देहधारी एखाद्या शत्रूला मारनार्या व्यक्तीचा वाचक नाही. तर जो काम, क्रोध, मोह, अहंकार, द्वेष, मत्सर, निद्रा इत्यादी शत्रुन्शी शौर्याने लढ़ण्यास सज्ज राहण्याचा बोध दिला गेला आहे. यासाठी फार शुरपणा व निर्भयता असणे आवश्यक आहे.

हिंसात्मक युद्ध सर्वकाल होऊ शकत नाही. प्रत्येक क्षणाला तर आपल्या जन्मजन्मातरच्या जीर्ण संस्कारांशी, दूषित विचारांशी, अर्थात मनोविकारांशीच युद्ध चालु असते, तेव्हा नि:संदेह गीता ज्ञानाचा उद्देश माया अथवा षड़रिपु आणि त्यांच्या अगणित सेनेशी युद्ध करन्याकरिता प्रेरित करने आणि मानवाला योगयुक्त बनविणे हाच उद्देश आहे. ज्ञान हे बाणा सारखे असतात. हेच ज्ञानबिंदु दिव्य अस्त्र शस्त्र आहेत. या ज्ञान शस्त्रांद्वारे विकाराना मारने म्हणजेच युद्ध होय. मनुषयात्म्याने विकारांशी बेपरवाही नव्हे तर युद्धखोरी वृत्तीने तोंड देऊन त्यांचा अंत करावा. सर्व युद्धान मध्ये हेच अध्यात्मिक धर्मयुद्ध श्रेष्ठ युद्ध आहे यामुळेच स्वर्गाची स्थापना इथेच होऊ शकेल आपल्या स्वत:च्या दूषित वृतिशी युद्ध कर म्हणजे शान्ति आपोआप मिळेल. या युद्धा द्वारे तू कायमचा दुःख बंधणातुन मुक्त होशील.

Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited. Its great Source Of Marathi articles. all copy Protected articles. Cautious! Don’t Copy Articles..

Source : Marathi Unlimited.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu