पाठिंबा केवळ राष्ट्रपतीपदासाठी!- बाळासाहेब
पी.ए. संगमा हे माझे मित्र आहेत; पण, प्रश्न मैत्रीचा नाही, जातीचा नाही. राजकारणात गणिते वेगळी असतात. प्रणव मुखर्जी यांच्यासोबत झालेली चर्चा हे सीक्रेट आहे, असे सांगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’वर राष्ट्रपतिपदाचे यूपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील उघड करण्यास नकार दिला. ‘यूपीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जींना शिवसेनेने दिलेला पाठिंबा हा जातीच्या किंवा मैत्रीच्या आधारावर दिलेला नसून तो केवळ राष्ट्रपतीपदासाठीच दिलेला आहे’, अशी स्पष्टोक्ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा ‘मातोश्री’वर मुखर्जींच्या भेटीनंतर दिली.
Source : Marathi Updates.