काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रातील सत्ताधारी संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) उमेदवार प्रणव मुखर्जी रविवारी देशाचे नवे राष्ट्रपती म्हणून निवडून आले. मुखर्जी यांनी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील विरोधी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) उमेदवार पी. ए. संगमा यांचा मोठ्या मत-फरकाने पराभव केला. मुखर्जी यांनी एकूण मतांपैकी ५१ टक्के मिळवली असून त्यामुळे माजी अर्थमंत्री आणि यूपीएचे ट्रबलशुटर म्हणून ओळखले जाणा-या प्रणबदांचा ‘रायसीना हिल’वर जाण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. मुखर्जी यांना देशाचे सरन्यायाधीश २५ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ देतील. त्यानंतर ते अधिकृतरित्या पदभार सांभाळतील.
Source : Marathi Unlimited.