संपुआ उमेदवार प्रणव मुखर्जी आणि भाजपाप्रणीत रालोआ आघाडीचे पी. ए. संगमा यांच्यापैकी भारताचे १४ वे राष्ट्रपती म्हणून ‘रायसीना हिल’वर कोण जाणार, हे आज होणार्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी १९ जुलैला मतदान झाले. आज ११ वाजता संसद भवनात मतमोजणी सुरू होईल. दुपारपर्यंत निवडणुकीचे निकाल येणे अपेक्षित आहे. संख्याबळाच्या आधारावर प्रणव मुखर्जी यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
Source : Marathi Unlimited.