राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालामध्ये यंदा नाशिक विभागाचा निकाल ७७.०७ टक्के लागला असून हा निकाल ५.६२ टक्क्यांनी घसरला आहे. यंदा राज्यभराचा निकाल ८१.३२ टक्के लागला असून राज्यात नाशिक विभाग पाचव्या स्थानावर तर कोकण विभाग अव्वलस्थानी आहे.
कोकण विभाग अव्वल
नव्याने स्थापन झालेल्या कोकण विभागाने बारावीप्रमाणे दहावीच्या निकालातही उत्तुंग कामगिरी केली असून बोर्डाने बुधवारी जाहीर केलेल्या या निकालात ९०.७६ टक्के विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण होऊन कोकणचा झेंडा फडकता ठेवला आहे.
८२ टक्के शाळांना ‘ फर्स्ट क्लास ‘
यंदा राज्यातील ८२ टक्के शाळांनी ‘ फर्स्ट क्लास ‘ मिळवला आहे. राज्यातील सुमारे १६ हजार ५७० शाळांचा निकाल ६० टक्क्यांपेक्षा जास्त लागला आहे तर , एकूण ९७ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे.
९७ शाळांचा भोपळाही फुटला नाही
दोन हजारांवर शाळांचा निकाल ५० टक्क्यांहून कमी
दहावीच्या निकालात राज्यातील तब्बल ९७ शाळांना भोपळाही फोडता आलेला नाही. दोन हजार २१६ शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत लागला आहे. शंभर टक्के निकाल पटकावलेल्या शाळांची संख्या दोन हजार ४५६ आहे.
पुणे, मुंबई, कोल्हापूर, कोकण या विभागीय मंडळांच्या निकालाची टक्केवारी ८० टक्क्यांच्या पुढे असली, तरी दुसरीकडे किमान कामगिरी राखता न आलेल्या शाळांचे प्रमाणही चिंताजनक आहे.
Source : Marathi Unlimited.