अता राष्ट्रपती कोण होणार?




Like
Like Love Haha Wow Sad Angry

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीला वेगळे वळण


राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीसाठी काँग्रेसची पहिली पसंती प्र ‍ णव मुखर्जी यांनाच आहे , हे बुधवारी स्पष्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी व समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी थेट पंतप्रधान मनमोहन सिंग यांचेच नाव उमेदवारीच्या रिंगणात आणल्याने रायसिना हिलच्या रणात वेगळेच रंग भरले आहेत . राष्ट्रपतिपदाच्या हालचालींसाठी बुधवारचा दिवस महत्त्वाचा होता . तृणमूलच्या नेत्या व पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा केली . उमेदवारीसाठी सोनियांचा प्राधान्यक्रम प्रणव मुखर्जी … हमीद अन्सारी असा आहे , असे ममतांनी भेटीनंतर पत्रकारांना सां ‌ गितले . याबाबत आमचा निर्णय झालेला नाही , अशी पुस्ती जोडण्यास मात्र त्या विसरल्या नाहीत ! सोनियांच्या भेटीनंतर ममतांनी भेट घेतली सप अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांची . या भेटीनंतर दोघे पत्रकारांना सामोरे गेले आणि त्यांनी त्यांच्या पसंतीचे उमेदवार जाहीर केले . त्यात पंतप्रधान मनमोहन सिंग , माजी राष्ट्रपती ए . पी . जे . अब्दुल कलाम आणि माजी लोकसभा अध्यक्ष सोमनाथ चटर्जी यांच्या नावांचा समावेश होता ! या घडामोडींनंतर काँग्रेसने रात्री उशिरापर्यंत कुठलीही अधिकृत प्रत ‌ िक्रिया नोंदवली नव्हती . मात्र , पंतप्रधान मनमोहन सिंग ब्राझिलच्या दौऱ्यावर जाणार असून , ते परतल्यानंतरच उमेदवाराची अधिकृत घोषणा केली जाईल , असे सांगण्यात आले .
कुणाची पसंती कुणाला ?
काँग्रेस : प्रण ‍ व मुखर्जी , हमीद अन्सारी
तृणमूल – सप : मनमोहन सिंग , अब्दुल कलाम , सोमनाथ चटर्जी.

Source : Online.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu