राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे गौप्यस्फोट.
अण्णा हजारे यांना राष्ट्रद्रोह्यांनी घेरले असून, या तत्त्वांना विदेशी मदत मिळत असल्याचा गौप्यस्फोट पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी आज केला. चेन्नई विमानतळावर पत्रकारांना नारायणसामी यांनी सांगितले की, स्वत: अण्णा हजारे शालीन व्यक्ती आहेत. पण दुर्दैवाने सध्या त्यांना राष्ट्रद्रोही तत्त्वांनी घेरले आहे. त्यांच्याभोवती असलेल्या या राष्ट्रद्रोही तत्त्वांना विदेशी शक्तींचे सर्मथन आहे. गतवर्षीच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान टीम अण्णाने गोळा केलेल्या निधीचे काय झाले,असा सवाल त्यांनी केला. त्यांचा इशारा टीम अण्णातील प्रमुख सदस्य अरविंद केजरीवाल व किरण बेदी यांच्याकडे होता. कोणताही जनाधार नसलेले टीम अण्णीमधील काही स्वयंभू नेते सरकारला अस्थिर बनविण्याचे प्रयत्न करीत आहेत. कोळसा खाण पट्टय़ांच्या वाटपासंबंधी गैरप्रकारांबाबतही आपण पुरावे दिलेले नाही. बहुधा कॅगच्या अहवालाचा फुटलेला कच्चा मसुदा व प्रसिद्धी माद्यमांतील त्याबद्दलचे लिखाण यावरून आपण हे आरोप केले असावेत. उपिस्थत केलेल्या मुद्दय़ांच्या चौकशीसाठी प्रचलित कायदेशीर व घटनात्मक चौकट पुरेशी आहे असे ते म्हणाले.