दिनचर्या व त्याचे पालन.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

Time-table-and-management, for marathi articles…
वेळ म्हणजेच जीवन, वेळेचा सदुपयोग म्हणजे दिनचर्या तक्ता वेळ म्हणजेच

how to manage time
दिनचर्या तक्ता एका आरश्या सारखा असतो. ज्यात आपण आपल्या जीवनाचे दर्शन करू शकतो, सदगुणांचा शृंगारकरण्यासाठी दिनचर्या त्क्तारूपी आरश्यात पाहणे जरुरीचे आहे. हा आरसा म्हणजे आपला मित्र, तसेच संरक्षक सुद्धा आहे. दिनचर्या तक्ता आपल्याला आवश्यकते नुसार घडविणारा एक साचा आहे, असा हितेषी या विश्वात कोणी नसावा.
जंगल उगविण्यात कोणतीही मेहनत लागत नाही, परंतु सुंदर बाग बनविण्यात योजना बनवून विचारपूर्वक असे घोर परिश्रम करावे लागतात. तसेच जीवन जगण्यासाठी त्यानुसार कलेची योजना व तपस्येची गरज आहे.१. सकाळी उठणे :-  लवकर झोपणे व  लवकर उठणे म्हणजे देवत्वाची निशाणी समजली जात असे, पण आता तसे राहिले नाही, मुले किंवा आईवडील देखील रात्री पर्यंत टी.व्ही वै. मनोरंजन कार्यक्रम, शॉपिंग,  फिरायला जाने, क्लब ईत्यादी मध्ये वेळ घालवून रात्री उशिरा पर्यंत उठणे हे प्रकार घडतात, पण हे योग्य नाही. लवकर झोपणे व लवकर उठल्याने व्यक्ती  जीवनात स्वास्थ्य संपदा, बुद्धी, प्रत्येक क्षेत्रात यश हे अवश्य प्राप्त करतात, त्यांच्यात मोद, उत्साह, स्पुर्ती, व आत्मविश्वास वाढतो.
२. जागरण प्रार्थना :- सकाळी जागल्या नंतर नवीन जन्म झाल्याची भावना करा,याकृपा प्रसादासाठी परमेश्वरास धन्यवाद द्या, पृथ्वी मातेस भावनात्मक नमस्कार करून आपल्या आजच्या कर्तव्याचा शुभारंभ करा.
३. उष;पान :- [ प्रांत: जल सेवन]- तन मनाची स्वच्छता, परिपूर्ण अश्या आरोग्या साठी उष:पान हे आई भवानीचे वरदान आहे, हा अनेक रोगांना दूर करतो.मातीच्या किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे योग्य आहे [सायंकाळी भरून ठेवून सकाळी प्यावे].
४. आसन किंवा प्राणायाम :- शरीराच्या अंग अवयवांना तसेच नसनाड्याना आजीवन स्वस्थ व क्रियाशील बनविण्यासाठी आसन प्राणायामाचे खूपच महत्व आहे. आत्म विश्वास, एकाग्रता, मानसिक शांती, राहणे तसेच काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, अहंकार, ईर्च्छा,द्वेष, छळ, कपट, तणाव, दबाव आणि भय ईत्यादी मानसिक रोगांन पासून मुक्ती मिळण्यासाठी ध्याना शिवाय दुसरा पर्याय नाही आज विश्वामध्ये या क्रीयान द्वारेलाभ उठविला जात आहे.
५. आजच्या केल्या जाणाऱ्या कार्याचे चिंतन :- मनातल्या मनात चिंतन करा कि ”मला आजच्या एका दिवसाचे जीवन मिळाले आहे” एका दिवसातल्या जीवनात मी श्रेष्टातले श्रेष्ठ कार्य करेन, सर्वान बरोबर प्रेमाचा व्यवहार करेन, मन, वचन, कर्माने कोणासही दुखविणार नाही. जीवनाच्या अनमोल क्षणांना मी व्यर्थ गोष्टीमध्ये, आळसात वाया घालविणार नाही, यास स्व:उन्नती व युग निर्माणाच्या कार्यामध्ये लावेन नंतर दिवस भरयाचे कार्य श्रेष्ठ रीतीने निर्धारित करेन.
६. सदगुणांना धरण करणे :- सद्गुण जीवनाचा सुगंध आहे, जो स्वत:ला तसेच अवतीभवतीच्या वातावरणाला सुगंधित करतो, आनंद देतो. सदगुण म्हणजे पुढे दिल्या प्रमाणे व्यवहार,
७. कमींना दूर करणे :- कमी कमकुवतपणाव अवगुण जीवन विकासास सर्वात मोठे बाधक आहेत. या कारणांनी व्यक्ती दु:ख, अशांती, अपमान व अपयशाने ठोकर खात फिरते, आपण आपलाच अभ्यास करा, अवगुणांना शोधून काढा व त्यांना दूर करण्याचे संकल्प करा.
८. दूरदर्शन, व्ही.डी.ओ, कम्प्युटर :- वर्तमानयुगात हि ईलेक्ट्रानिक साधने विज्ञांनाची मोठी देणगी आणि संपूर्ण विश्वासाठी ते एक वरदान [ आविष्कारच] आहे. परंतु याद्वारे दाखविले जाणारे अधिकतम कार्यक्रम मानवी मन आणि संस्कृतीवर विपरीत परिणाम घडविणारे होत चालले आहेत,टी.व्ही चा अवश्य उपयोग करा पण आपल्यासाठी उपयुक्त व शैकक्षणिक व चांगल्या मनोरंजक कार्यक्रमाना निवडून घ्या. रात्री उशिरा पर्यंत याच्या उपयोगापासून स्वत:स वाचवा.संतुलित जीवन जगा.* सर्व व्यक्ती आणि वस्तूनमध्ये फक्त गुणांना पाहणे.
* जेवण ताटात उष्टे सोडू नये, अन्नाबद्दल जास्त काही तक्रार करू नये,
* कमी बोलावे,हळू बोलावे,नम्र बोलावे,
* आपल्या घरातील वस्तू क्रमबद्ध व व्यवस्थित ठेवावे.
* वेळेचा पूर्ण सदुपयोग करावे, एक क्षण सुद्धा व्यर्थ घालवू नका.
*  प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक द्दृष्टीने पहा.
* मौनाचा सराव करा.
* आई वडीलांनी किंवा मोठ्याद्वारे सांगितलेल्या कार्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे, मनाई करू नये
*  आपल्या अनावश्यक  ईच्छाकमी करणे, आपल्या मधील गुण दोषांना पारखून सुधारण्याचे प्रयत्न करणे.

 

Source :Marathi Unlimited Articles.

 

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , , , , , , , ,



  • Polls

    महाराष्ट्रात सर्वात जास्त मायाळू लोक कुठे मिळतील ?

    View Results




Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Menu