sukhacha-sansar for marathi articles.
सुखाचा संसार ..
संसार, प्रपंच म्हटले की ताणतणाव असणारच. पती-पत्नी, मुले, संसार हा ताणाचा फेराचं आहे, पण त्यातही एक वेगळा आनंद असतो. अन त्या तही प्रत्येकात काही न काही दुर्गुण वां दोष असतात. प्रत्येकाचे प्रपंचही वे गवेगळे असतात. जशे ”निंदकाचे घर असावे शेजारी” हि म्हण प्रत्येकाला लागू आहे तसेच, घरात देखील प्रत्येकी एकमेकांचे दोष काढल्या जातात. हे काही वाईट नाही. तर या दोषांतून काही सुधारणा होणे हि तितकेच महत्वाचे आहे. दोष काढणे म्हणजेच वादविवाद, वादविवाद करणे हे योग्य आहे त्याशिवाय एकमेकातील दोष एकमेकांसमोर प्रगट कसे होणार? पण यावरून भांडत राहणे हे अयोग्य आहे. तर या वाद विवादाचा फायदा कसा घ्यायचा हे बघू! घरात वादविवाद झाला, आपले दोष काढण्यात आले म्हणून चिडचिड न करता त्यावर विचार करणे अति आवशयक आहे. कारण तुमच्या दोषांपासून कुणाचे आर्थिक, मानसिक, अथवा शारीरिक नुकसान होत आहेत काय! या गोष्टींवर विचार करणे हे महत्वाचे आहे आणि जर आपणाला वाटत असेल कि आपला दोष नसताना सुद्धा आपल्या वर आरोप लावण्यात येत आहे, अश्या वेळी, आपला विचार योग्य वेळ पाहून समंजसपणाने सविस्तर पुढल्या योग्य व्यक्ती जवळ शांतपणे समजावून सांगावा. [मुलांनी मोठयांना, किंवा पती-पत्नीने एकमेकांना] आपल्या दोषांवर टीका झाल्यास वाईट मानून घेऊ नये, तर त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक आहे. आपला चीडखोर स्वभाव असल्यास त्यावर दुसरया कडून गुप्तपणे टीका होतात. त्यामुळे आपलेच नुकसान होवून सुधारणा होण्याचे चान्सेस कमी होतात. काही प्रकारचे वाद किंवा दोष काढणे हे आपल्या सुधारण्या साठीच असतात. आपल्या टिकांवर नेहमी अर्थपूर्ण मनन करावे, नंतरच योग्य विचारकरून सुधारणा कराव्यात. चीडचिडेपण व क्रोध हा सर्वात हानीकारक गुण होय.
संसारात पती-पत्नीचा वाद हा वाद नसून स्पीडब्रेक आहे, हा आवश्यकते नुसार होणे जरुरीचे आहे त्यामुळे एकमेकांच्या मनातील विचार, समोरासमोर येवून योग्य मार्ग सुचतो. वादविवाद मुळेच एकमेकांच्या आवडी निवडी माहिती होतात. वाद्विवादात एकमेकाना दाबण्याचा प्रयत्न करू नये. वादा म्ध्ये नेहमी मोकळीक असावी. तेव्हाच संसारात मोकळेपणाने बोलू शकतात. कधी कधी अति प्रेमातही आपल्या आवडी निवडी दर्शवू शकत नाही, पत्नीचे आवडीचे पदार्थ बनविण्यात येतात, तेव्हा प्रेमापायी पती अस्वीकार करू शकत नाही, सर्व सहन केल्या जातात. हे तितकेसे योग्य नाही. पत्नीच्या दबावा खाली पती आपल्या आवडीनिवडी किंवा पत्नी पतीच्या दबावा खातर सर्व आवडीनिवडी दाबल्या जातात. तेव्हा वादातून का होईनात एकमेकांना समजून घेण्याचा चान्स मिळतो.असा हा वादाचा शिरस्ता चालूच राहतो.
Source : Marathi Unlimited Articles.
Read Latest Collection of Top Marathi Articles Only on Marathi Unlimited.