गेल्या वित्तीय वर्षात बँकेची एकूण कर्मचारी संख्या ७,४५२ ने कमी झाली पण कामाची वाढती मागणी लक्षात घेऊन बँक यंदाच्या वर्षी ९,५00 कारकुनांची भरती करणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. ३१ मार्च २0१२ अखेरीस स्टेट बँकेत एकूण २,१५, ४८१ कर्मचारी होते. त्यात ८0,४0४ अधिकारी, ९५,७१५ कारकुनी कर्मचारी व बाकीचे ३९, ३६२ कनिष्ठ श्रेणीतील कर्मचारी होते. वाहन कर्ज व गृहकर्जाच्या क्षेत्रात बँक सर्व बँकांमध्ये पहिल्या क्रमांकावर असून ३१ मार्च २0१२ अखेर या दोन क्षेत्रांतील किरकोळ कर्ज वितरण १0.९ टक्क्यांनी वाढून एकलाख ८२ हजार ४२७ कोटी रुपये एवढे झाले.
चालू वित्तीय वर्षात ९,५00 कर्मचार्यांची भरती होणार आहे. बँकेच्या २0११-१२ या वित्तीय वर्षाच्या वार्षिक अहवालासोबत भागधारकांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात स्टेट बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांनी ही माहिती दिली आहे.