सोयाबीनची कोफ्ताकरी




Soya Kofta Curry :

Soya Kofta Curry is Protein-rich food. How to make Soya Chunks Kofta Curry Recipe. Soya chunks contains plain flavor but absorbs sauce and curry well. Proper gravy enhance the taste of soya chunks.


साहित्य :
एक वाती सोयाबीनचे क्यूब, दोन ब्रेंड स्लायिस, दोन चमचे पनीरचा चुरा, अल लसून पेस्ट एक चमचा, दोन टोमाटो, दोन कांदे, भिजवून ठेवलेली दोन चमचे खसखस.

कृती : सोयाबीनचे तुकडे तीन तास पाण्यात भिजवावे. पाणी तीन चार वेळा बदलवे. नंतर उकळवून घ्यावे. गार झाल्यानंतर हे तुकडे पिळून ब्रेडच्या तुकड्याबरोबर मिक्सरमधून फिरवून घ्यावे. गार झाल्यानंतर हे तुकडे पिळून ब्रेडच्या तुकड्याबरोबर  मिक्सरमधून फिरवून घ्यावे. या मिश्रणात आलं, लसून, हिरवी मिरची, कोथिंबीर, गरम मसाला घालावा. व्यवस्थित माळून मिश्रणाचे कोफत्यासारखे गोळे बनवावे. पातळ बाटल्यास रवा घालावा. चपटे किंवा गोल कोफ्ते तळून घ्यावेत. राष्यासाठी कांदे चिरून मिक्सरमधून बारीक करावे. आलं लसून टोमाटो खसखस एकत्र करून मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यावी. कांदा तेलात परतवून तयार केलेली पेस्ट त्यामध्ये टाकावी. तिखट व गरम मसाला चवीपुरता टाकून पाणी घालून रस्सा तयार करावा. चांगली उकळी आल्यानंतर गासं बंद करावा. या चटकदार राष्यामध्ये नंतर तयार केलेले कोफ्ते घालावे. सोयाबीनची कोफ्ताकरी स्वादिष्ट आणि पौष्टिक असते.

Source :
Marathi Unlimited

हेमावती म. भेंडारकर. नागपूर ९

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu

प्रस्तावना

प्रिय वाचकहो,

मराठी अनलिमिटेड या संकेतस्थळाची सुरुवात सन २०१० मध्ये मराठी भाषा, साहित्य आणि उपयुक्त माहिती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने करण्यात आली. गेल्या १५ पेक्षा अधिक वर्षांच्या प्रवासात आम्हाला महाराष्ट्रासह जगभरातील मराठी वाचकांचे प्रेम, विश्वास आणि भरभरून पाठबळ लाभले आहे. आज आमचे एक मोठे आणि विश्वासार्ह वाचक जाळे निर्माण झाले आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.

आमचा मुख्य उद्देश मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करणे तसेच विविध विषयांवरील उपयुक्त, ज्ञानवर्धक आणि माहितीपूर्ण लेख वाचकांना विनामूल्य उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान, व्यवसाय, शासन योजना, करिअर, संस्कृती आणि इतर अनेक विषयांवरील माहिती आम्ही सातत्याने प्रकाशित करत असतो.

मराठी अनलिमिटेड हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्या वाचकांना जोडणारे एक व्यासपीठ आहे. आपल्या सततच्या सहकार्यामुळे आणि विश्वासामुळेच आम्ही हा प्रवास यशस्वीपणे पुढे चालू ठेवू शकलो आहोत.

यापुढेही दर्जेदार, विश्वासार्ह आणि उपयुक्त माहिती मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

आपल्या प्रेम आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

प्रसन्ना भेंडारकर
मराठी अनलिमिटेड