श्रवण, चिंतन, मनन, परिपूर्णते करीता.




Like
Like Love Haha Wow Sad Angry

  श्रवण, चिंतन, मनन, परिपूर्णते करीता.

” आई–वडिलांना” — विसरू नका !

विसरा सर्वांना पण आई-वडीलांना कधी विसरू नका |

अनंत उपकार आहेत त्यांचे हि गोष्ट कधी विसरू नका ||

             पाषाण पूजलेत त्यांनी अनेक, अरे तुमच्या जन्मासाठी |

             पाषाण बनून आई-वडीलांचे, हृदय कधी दुखवू  नका ||

मिखातील घास काढून अरे, ज्यांनी तुम्हाला मोठे केले |

अमृत पाजले तुम्हाला,  तुम्ही त्यांच्या साठी विष ओकू नका ||

             स्वत:हा ओल्यावर झोपूनही, झोपविले तुम्हास कोरड्या जागी|

             आईच्या त्याप्रेमळ नेत्रांमध्ये, चुकुनही अश्रू आणू नका ||

किती केले कोड-कौतुक , ईच्छा हि तुमच्या पूर्ण केल्या|

पूर्ण करा ईच्छा त्यांच्या, हि गोष्ट कधी विसरू नका ||

             जिने फुले आच्छादिली होती, क्षणोक्षणी तुमच्या मार्गात |

             त्या मार्गदर्शकाच्या मार्गातील, तुम्ही काटे कधी बनू नका ||

लाखो कमवीत असाल तुम्ही,पण आई-वडिलांपेक्षा जास्त नाही |

सेवे शिवाय सर्व राख आहे, तुम्ही गर्वाने कधी फुगू नका ||

             मुलां कडून सेवा ईच्छिता, तर मुलगा बनून सेवा करा |

             जसे करावे तसे भरावे, हा न्याय कधी विसरू नका ||

पैसा तर भरपूर मिळेल, पण आई-वडील काय मिळू शकतील?

क्षणोक्षणी त्या पावन चरणांचा,आदर करणे तुम्ही विसरू नका ||

 

Source :Marathi Unlimited Articles.

Like
Like Love Haha Wow Sad Angry




, , ,

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.



Menu