sanwad-sadhnar-tenwhach-khulnar for marathi articles
संवाद साधणार – तेव्हांच खुलणार.
हल्ली संवाद कौशल्य हि महत्व पूर्ण बाब बनली आहे. मार्केटिंग असो पब्लिक रिलेशन, डील, मिटींग्ज, आयटी क्षेत्र, ‘कम्युनिकेशन स्कील” हवीच हवी. पती पत्नीच्या नात्यात संवाद हा अतिशय मोलाचा! नात जपण, टिकण, नि बहरणं हे संवादी राहण्यातून घडत. करिअरवाल्या किंवा कमावत्या किंवा सामान्य पत्नींनी कुटुंबात सुसंवाद साधने अतिशय महत्वाचे आहे. तरच जोडीदार,मुलं, ज्येष्ठ, नातेवाईक किंवा शेजारी संवादातूनच जवळ येतात.जे नातं निखळ प्रेमावर असायला हव, ते तसच टिकून राहाणं पती पत्नी मध्ये आजच्या ताणतनावच्या जगात, स्पर्धेच्या युगात गरजेचे आहे, सहजीवनासाठी संवाद हवा,यात वेळ नाही, प्रचंड बिझी, घर व करिअर करताना उसंत कुठली? संवाद कसा साधता येईल? असले प्रकार होऊ नयेत. हि काळजी घ्यावी. दिवस भरातून प्रत्येकाने एकमेकांसाठी वेळ काढावा. दिवस भरात काय घडलेले तपशील सांगावे. एक जन सांगत असताना दुसऱ्यान ते लक्षपूर्वक एकावं. ज्या भावनेन जोडीदार बोलतो त्याच भावनेन ऐकायला शिकावं.महत्वाचे मुद्द्ये स्पष्टता व खुलाशाने सांगावे. प्रत्येक वेळी मतैक्य होईलच, असा अट्टाहास नसावा. बोलताना मला अस वाटत, माझी भावना अशी आहे, हेतू असाआहे अर्थ सहित वाक्ये बोलावीत. एकणार्याने बोलन पूर्ण होईस्तोवर वाक्य मध्येच तोडू नये. हेच संवाद कौशल्य लक्षात घ्याव. या नात्यातील संवाद हा दोघां पुरता हवा. ईतरांना एकू जाणार नाही ईतक्याच स्वरात बोलाव. मतभेद कारणांन सहित स्पष्ट सांगावेत. भावनांची कदर करणारी शब्द योजना असावी.
दोघांनीही नि:संकोचपणे बोलाव. आवेशवजा हुकुमी भाषा नसावी. तशी भाषा असल्यास संवादापेक्षा वादविवाद घडेल. बरयाचदा जोडीदार काहीच बोलत नाही, हीच मुळी तक्रार बायांची असते! बोलतं करणं हे संवाद कौशल्याचा कस लावनार बायकांच्या समृद्ध जीवनासाठी समस्या सोडविण्याच तंत्र आणि कौशल्य हे तर संवाद साधता साधता आत्मसात होऊन जात. संवादासाठी वेळ, सहवास हवा. शिवाय दोघांनी एकमेकांना स्वीकाराव विनाअट! गुणदोषासह स्वत:ला व जोडी दाराला जाणून घ्याव.मग संवादी राहून, संवाद कौशल्य वापरून सहजीवनाला समृध करता येत.